BULDHANAVidharbha

केंद्र सरकारच्याविरोधात काँग्रेसचा बुलढाण्यात मूकमोर्चा!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची दडपशाही व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज बुलढाण्यात मूक निषेधमोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

शहरातील संगम चौक येथून या मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी आमदार धीरज लिंगाडे, विजय अंभोरे, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, अ‍ॅड. विजय सावळे हे प्रमुख नेते होते. जयस्तंभ चौक, बाजार पेठ, जनता चौक, कारंजा चौक, भोंडे सरकार व तहसील चौक मार्गे मोर्चा फिरला. मोर्चाचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला. यावेळी तिथे सत्याग्रह करण्यात येऊन कारवाईचा मौन निषेध करण्यात आला. मोर्चात बाबासाहेब भोंडे, संतोष आंबेकर, तेजेंद्रसिंह चौहाण, एकनाथ खर्चे, गणेशसिंग राजपूत, विनोद बेंडवाल, प्रमोद अवसरमोल, वसंत देशमुख, चित्रांगण खंडारे, नंदकिशोर बोरे, तुळशीराम नाईक, डॉ. देवकर, आदी लोक सहभागी झाले. तोंडावर, हातावर लावलेल्या निषेधात्मक काळ्यापट्ट्या आणि कोणत्याही घोषणा न देता निघालेला हा मोर्चा लक्ष्यवेधी ठरला.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!