BuldanaChikhaliMaharashtra

धुऱ्याचा वाद विकोपाला गेला.. पोलिस पाटलाने महिलेचा मर्डरच केला !

चिखली (तालुका प्रतिनिधी) –  पोलिस पाटील हा शासन व प्रशासन मधला दुवा असतो. गावातील शांतता कायम राहावी यासाठी तो गावातील गुन्ह्याची माहिती पोलिस प्रशासन देवून आपले कर्तव्य निभावत असतो. परंतु चिखली तालुक्यतील काटोडा येथील पोलिस पाटील बबन थिगळे याने शेतीच्या धुऱ्याचा वादातून गावातील सौ.कुशीवर्ता धूड या महिलेचा मर्डरच केल्याची दुदैवी घटना आज 2 जुलै रोजी चिखली तालुक्यातील काटोडा येथे घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. याप्रकरणी आरोपी पोलिस पाटील बबन थिगळे याच्यासह इतर 10 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          अनेकांची अनेक हेक्टर जमिन पडीत राहते, परंतु छोट्याशा धुऱ्याच्या वादातून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मर्डर झाल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. या घटना घडू नये यासाठी शासनस्तरावरुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुध्दा करण्यात येत असते, परंतु तरीसुध्दा धुऱ्याच्या वादातून खून होतातच. याच घटनेची पुनरावृत्ती चिखली तालुक्यतील अंढेरा पोस्टे.अंतर्गत असलेल्या काटोडा या गावी आज 2 जुलै रेाजी घडली. धुऱ्याच्या वादातून पोलिस पाटील बबन थिगळे एवढा बेफाम झाला की त्याने सदर प्रकार यांचे जावई दिपक हनुमान टेकाळे याला सांगितला. जावाई दिपक टेकाळे भी सासऱ्याच्या कटात सहभागी होवून त्या पठ्ठयाने चिखली येथून चार ते पाच गुंडे घेवून वामनराव धूड यांचे शेत गाठले आणि शेतात वामनराव धूड यांचे दोन मुले व सून शेत काम करीत होते. या थिगळे कुटुंबीयांचा काहीही विचार न करता गुंडानी सरळ त्यांच्या अंगावर जावून मारहाण करण्यात सुरवात केली. यावेळी धूड यांच्या सुनेने आरडाओरडा करीत घटनास्थळा वरुन पळ काढला. हे खुनी गावगुंड एवढ्यावरच न थाबता त्यांच्या घरात घुसून वामनराव धूड व त्यांची पत्नी कुशीवर्ता धूड यांना लोखंडी रोड व कुऱ्हाडीने जबर मारहाण करुन निघून गेले. घटना दुपारी घडल्याने शेजारी कोणही नसल्याने गावकरी आवाज कुणालाही ऐकू आला नाही. काही वेळाने मुले घरी आले आणि घरात जखमी आई वडील पाहून मोठमोठ्याने रडू लागले. तेव्हा गावातील लोक जमा होवून जखमींना चिखली येथील येथे उपचारार्थ हलविले. उपचारा दरम्यान कुशीवर्ता धूड यांचा मृत्यू झाला, तर वामनराव धूड यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले .

नातेवाईकांच्या आक्रमकतेमुळे 302 चा गुन्हा दाखल..
महिलेच्या मृत्यूची बातमी गावात व नातेवाईकामध्ये पसरल्याने मोठ्या संख्येने नातेवाईक गोळा होवून जोपर्यंत खुनी आरोपींना गजाआड केल्या जात नाही तोपर्यंत महिलेचे प्रेत ताब्यात घेण्यास नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रकरण मोठ्या प्रमाणात चिघळले होते. प्रकरण हाताबाहेर जावू नये यासाठी अंढेरा ठाणेदार व त्यांचे कर्मचारी यांनी तात्काळ काटोडा गाव गाठून आरोपीचा तपास घेत पोलीस पाटलासह तीन गजाआड केले तसेच काही फरार झालेले 2 जण, 4 महिला कवढळ शिवारातून पकडून आणून त्यांना गजाआड केले. दतात्रय वामनराव धूड यांच्या तक्रारीवरुन आरोपी पोलीस पाटील बबन सखाराम थिगळे , श्याम बबन थिगळे , जावई दिपक हनुमान टेकाळे यांच्या सह १० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यामध्ये ३०२ चा गुन्हा वाढविण्यात आला. . सर्व आरोपींना पोलिसांनी न्यायालयात पाठवून काटोडा गावात महिलेच्या अंत्यसंस्कार वेळी ठाणेदार हिवरकर यांनी मोठा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास अंढेरा ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार पोफळे यांनी केला.

अशी आहे प्रकरणाची पार्श्वभुमी
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटोडा येथील रहिवासी वामनराव धूड यांच्याकडे काटोडा शिवारात गट क्र. १९१ मध्ये शेती आहे . त्यांच्या शेतीशेजारी आरोपी पोलिस पाटील बबन सखाराम थिगळे यांची जमीन आहे. या दोघा शेतकऱ्यांमध्ये शेत धूऱ्याच्या वादावरून नेहमी वाद सुरु होता. वाद आपसात मिटविण्यासाठी वामनराव धूड यांनी सरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष तथा काही प्रतिष्ठित लोकांना घेवून समजोता करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आरोपी पोलिस पाटील बबन थिगळे याने समजोता न करता शुल्लक कारणावरुन शिवीगाळ व लोटपाट केली असल्याने वामनराव धूड यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिस पाटील बबन थिगळे याच्यावर अंढेरा पोस्टे.ला भादंवीचे कलम ३०७ , ४५२, १४३, १४७, १४८, १४९, २९४, ४२७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा राग मनात धरुन बबन थिगळेने जावाई व गुंडांच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!