मोताळा(प्रतिनिधी) सध्या जिल्ह्यात विनयभंग, अत्याचाराच्या घटनेत दिवसेनदिवस मोठी वाढ होत आहे. मोताळा तालुक्यातील धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेल्या एका गावामध्ये 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना आज 2 जुलै रोजी सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास घडली. पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.
पिडीतेच्या आईने धा.बढे पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घरी एकटीच असतांना आरोपी संतोष उत्तम मोहिते (वय 28) हा घरात घुसून अल्पवयीन मुलीला खाली ओढून तीचे दोन्ही हाथ मागे धरुन ठेवीत, ओरडशील तर तुला ठार मारेल अशी धमकी देवून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. यावेळी फिर्यादीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीस लोटपाट करुन पळून गेला. अशा फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे.ला आरोपी संतोष मोहिते याच्यावर अप क्रमांक 167//2022 भादंवीचे कलम 376 (2) (N), 376(AB), 452,323,506, सहकलम 4 बा. लै.अ.सं. अधि. सन 2012 अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
Leave a Reply