चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील गुरुदेव आश्रमात अखंड हरिनाम सप्ताह व चरितामृत कथा कार्यक्रम सुरु असून, गुरुवार, दि.२३ मार्चरोजी या वर्धापन महोत्सवाची सांगता होत आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने वारकरी मंडळी तसेच गुरुदेवभक्त दाखल होत असतात. त्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडाव्यात, भाविक-भक्तांची गैरसोय होऊ देऊ नये, अशी मागणी चिखली आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.
उद्या होणारा सोहळा सांगता कार्यक्रम व प्रसाद वितरण पाहाता, हजारो भाविक गुरूदेव आश्रमाकडे जाणार आहेत. त्यामुळे येणार्या जाणार्यांची गैरसोय होवू नये म्हणून महोत्सवदिनी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत परिवहन महामंडळाच्या जादा बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी आगार व्यवस्थापक चिखली यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदन देतेवेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख नंदु कर्हाडे, ह.भ.प.गजानन पवार, ह.भ.प.शंकरसिंग मोरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज गाडेकर, राजेंद्र महाराज तळेकर, ह.भ.प.हरिदास इंगळे, ह.भ.प.काशीनाथ महाराज बाहेकर, ह.भ.प.शुभम महाराज चिंचोले, ह.भ.प.दलसिंग सुरडकर, ह.भ.प. रविंद्र सपकाळ, ह.भ.प.किसन महाराज सुरडकर, ह.भ.प.गणेश शिंदे, ह.भ.प. रामदास रिंढे, ह.भ.प.सुदर्शन इनामे उपस्थित होते.