BULDHANAKhamgaon

प्रामाणिकता! ‘फोन पे’वर आलेले उत्तरप्रदेशच्या पेंटरचे पैसे पोलिसाने केले परत!

खामगाव (विनोद भोकरे) – आजच्या काळात रस्त्यावर सापडलेला रुपया कुणी कुणाला परत देत नाही. मात्र या स्वार्थांध दुनियेत ‘लाखमोलाचा प्रामाणिकपणा’देखील टिकून आहे. असाच प्रामाणिकपणा खामगाव येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल आशीष ठाकूर यांनी अधोरेखित केला. त्यांच्या फोन पेवर अचानक आलेले तीन हजार रुपये त्यांनी परत केले आहे.

सध्याचा काळ डिजिटल होत चालला आहे. पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी मोबाईल फोन पेचा वापर केला जातो. परंतु अनेक जणांना हे समजत किंवा उमजत नाही. परंतु ते प्रयत्न करीत असतात. उत्तर प्रदेश येथील गोरखपूरचे इसार शेख हे दारोदारी जाऊन पेंटिंग काम करतात आणि आपला कुटुंबाचा गाढा ओढतात. त्यांच्या वयोवृद्ध आई आजारी असल्यामुळे आईला फोन पे वरून पैसे पाठविताना चूक झाली. त्यांचे पैसे खामगाव शहर येथील प्रामाणिकपणे काम करणारे पोलीस कॉन्स्टेबल आशीष ठाकूर यांच्या मोबाईल फोनपेवर आले. अचानक तीन हजार रूपये आल्याने ठाकूर यांनाही आश्चर्य वाटले. हे पैसे कशाचे? हा प्रश्न ठाकूर यांना पडला आणि त्यांनी याची शहानिशा केली. दरम्यान, इसार शेख यांचे हे पैसे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ते पैसे तात्काळ परत करण्यासाठी सदर मोबाईलधारकास कॉल केला आणि इसार शेख यांचा फोन पे वर पैसे परत पाठविले. त्यामुळे आपण पैसे गमावून बसलो असा पश्चाताप करणार्‍या शेख यांनी ठाकूर यांच्यासह अल्लाहाचा शुक्रिया अदा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!