आळंदी (अर्जुन मेदनकर ) : केंद्र सरकारने शेतक-यांना रासायनिक खते खरेदी करताना दुकानदारांना जातीची अट टाकून लाखो शेतक-याचा अवमान करीत भावना दुखावल्या असल्याने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड.विष्णू तापकीर यांनी केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने डीबीटी पोर्टल वरून खत खरेदी करताना शेतक-यांना त्यांची जात विचारली जाते. त्या नंतरच पुढील फॉर्म उपलोड होण्याची यंत्रणा आहे. ही एक प्रकारे शेतक-यांची थट्टाच आहे. या प्रकारातून केंद्र सरकार देशात जातीयवाद वाढवून शेतक-यांची अवहेलना करीत आहे. यातून जातीय वादाचे विष देशात पेरले जात आहे. यामुळे केंद्र सरकारच्या अशा भूमिकेमुळे सरकारच्या विरोधात शेतक-यांत तीव्र नाराजी असून लाखो शेतक-यांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे शेतक-यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्य व केंद्र सरकारने सदरील डीबीटी पोर्टल वरून जात रकाना हटवून खत विक्री सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, या मागणी साठी शेतकरी व जनतेच्या वतीने शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्पेâ न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा खणखणीत इशारा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड.विष्णू तापकीर यांनी दिला आहे.