आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आळंदीत उत्साहात झाली. या बैठकीत भारतीय जनता पक्ष हा सत्ता केंद्रित नसून तो राष्ट्रहित सर्वतोपरी जपणारा पक्ष आहे. संघटनेला अनन्यसाधारण महत्त्व देणारा पक्ष असल्याचे अधोरेखित करीत मार्गदर्शन करण्यात आले. आळंदीत विजयाची नांदी घेऊन येणारी प्रदेश कार्यकारणीची बैठक उत्साहात झाली. या बैठकीत केंद्र शासनावाच्या माध्यमातील विविध लोकोपयोगी योजना थेट संबंधित लाभार्थ्याला पर्यंत पोहोचविण्यासाठी थेट संबंधित लाभार्थ्याच्या वस्ती पर्यंत जाऊन माहिती घेण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री संजय निर्मलजी होते. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक खरटमलजी, प्रदेश संघटन सरचिटणीस मोहन वनखंडे, प्रदेश सरचिटणीस सचिन आरडेजी, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आळंदीचे माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, अभिजित उमरगेकर, उद्योजक गणेश दिवाने, उद्योजक मनोहर दिवाने, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणीची सदस्य, शहर व जिल्हा अध्यक्ष, प्रदेश सोशल मीडिया प्रभारी, प्रदेश मिडिया प्रभारी आदी उपस्थितीत होते. .
महाराष्ट्र राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर होत असलेले धोरणात्मक बदल, राष्ट्रीय राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी फक्त देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्या विकासाच्या विषयाला घेऊन जगाचा विश्वास जिंकणारे मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वात सुरू असलेले संघटन आणि सत्ता कारण या विषयाला घेऊन अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनामध्ये वैचारिक मंथन या बैठकीत झाले. अतिशय उत्साहात येणाऱ्या काळामध्ये विजयाची नांदी घेऊन येणारी प्रदेश कार्यकारणीची हि बैठक उत्साहात झाली.
या बैठकीत निर्मलजी म्हणाले, येथील लोकवस्तीत जाऊन माहिती घेण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध जनतेच्या लाभाच्या योजना पासून कोणीही लाभार्थी वंचित राहू नये. योजना लोकांसाठी असल्याने त्या सर्व सामान्यांना पर्यंत पोहोचविण्यासाठी संदेश देण्यात आला असून कार्यकर्ते प्रत्येक लाभार्थ्यास योजना समजावून सांगून लाभ मिळवून देतील अशी ग्वाही त्यांनी दिली. आळंदी येथील घरकुल योजना लाभार्थ्याना उर्वरित घरकुल रक्कमेचा निधी आणि आयुष्यमान भारत योजनेतील स्वास्थ्य कार्ड उर्वरित लोकांना उपलब्द्ध करून देण्यास शिबिरांचे आयोजन करण्यात ये असल्याचे त्यांनी सांगितले.