Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी नागेश पाटील यांची चौकशी करा!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासनाधिकारी नागेश पाटील यांचे गैरशिस्तीचे कामकाजाची चौकशी होऊन आरोग्य विभागातून त्यांना कार्यमुक्त करा, अशी मागणी नागेश पाटील हटाव कृती समिती यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

२६ डिसेंबर २०२२ रोजी विधानसभेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांना सेवा निलंबित करण्यात आले. ज्या कारणांसाठी निलंबन केले आहे ते कारण पाहता, कार्यालयात आलेल्या पत्राला वेळीच दखल घेऊन प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर केला नाही. प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी ही कार्यालयाची असते व पत्रावर वेळीच कार्यवाही व्हावी. म्हणून शासनाने सहाय्यक प्रशासन अधिकारी हे पद निर्माण केले आहे. शासनाकडून आलेल्या चार पत्राची वेळीच दखल घेतली असती तर एखाद्या अधिकार्‍याला अशा कारवाईला सामोरे जाणे भाग पडले नसते. पाटील हे कार्यालयात अनेक दिवसापासून कार्यरत आहेत. त्यांच्या जॉबचार्ट प्रमाणे ते कोणतेही काम वेळीच करत नाहीत. आरोग्य विभागात कार्यरत असतांना सहाय्यक प्रशासक अधिकारी म्हणून तेथेच पदोन्नती चुकींच्या मार्गाने वरिष्ठांची दिशाभूल करुन घेतली आहे व ते कर्मचा-यांना चुकीची माहिती देऊन जाणीव पूर्वक मानसिक व आर्थिक त्रास देण्याच्या हेतूने कामकाज करतात.

आस्थापना विषयक कर्मचारी व लेख विषयक कर्मचारी यांचेकडे आलेले टपाल, निर्गत केलेले टपाल, प्रलंबित टपाल, यांचा दर साप्ताहिक आढावा घेतले जात नाही. आरोग्य कर्मचारी महिला यांना १०, २० व ३० वर्षे प्âूर्ण झालेले कालबद्ध पदोन्नतीचे पस्ताव संघटनेने, संबंधित कर्मचा-याने व वरिष्ठाने वारंवार सांगूनही तयार करुन घेतले नाहीत. याकामी अक्षम्य दुर्लक्ष करणे, आरोग्य कर्मचारी महिला यांच्या पदोन्नती वेळी तीन महिला कर्मचारी पदोन्नतीस सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पात्र असूनही त्यांची नांवे आर्थिक फायदा करवून घेऊन ज्येष्ठता यादीतून वगळले व त्यांना पदोन्नती मिळून दिली ही ही प्रशासकीय दृष्टया केलेली गंभीर चुक आहे. आरोग्य संवर्गाच्या सन २०२२ च्या ज्येष्ठता याद्या अद्यापपर्यंत तात्पुरते व अंतिम प्रसिध्द केलेले नाहीत. त्या बाबत काहीही कारवाई केली जात नाही. दर वर्षी सदरच्या ज्येष्ठता याद्या २० मार्च पूर्वी अंतिम करून प्रसिध्द करणे ही शासनाची जबाबदारी असतांना या बाबीकडे दुर्लक्ष केलेले आहे. मंगुडकर, आरोग्य सहाय्यक यांना एकही लाभ न देता सेवानिवृत्त झालेले असूनही त्यांना कोणताही लाभ दिलेला नाही.

श्रीकृष्ण घंटे, आ. सहाय्यक यांच्या प्रकरणात गेले वर्षभर त्यांचे सेवापुस्तक स्वतःजवळ ठेवून त्यांचेकडून वारंवार पाट्या घेऊन व आर्थिक मागणी करुन काम केलेले नाही. राऊत यांना निलंबत केल्यानंतर त्यांचा खुलासा कार्यालयात दिल्यानंतर त्या खुलाश्यावर एक वर्ष कांहीही कारवाई केलेली नाही, व्ही. जे. टाक, सेवानिवृत्त आरोग्य सेवक यांचे सेवानिवृत्तीचे लाभ देण्यास जाणून बुजुन दिरंगाई केली त्यामुळे त्यांनी व्याजासहित रक्कम मिळण्यासाठी शासनाकडे तक्रार केलेली आहे यास नागेश पाटील जबाबदार आहेत. निर्मल पवार (वय- ५६ वर्षे) आ. सहाय्यक, आ. सहाय्यक, प्रा.आ.केंद्र, अनगर हे बदलीस पात्र असतांना त्यांची बदली नागेश पाटील यांनी वरिष्ठ अधिकारी यांना चुकीची माहिती देऊन त्यांना सतत डावलण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचारी पुकाळे व अन्य दोन कर्मचारी यांना चुकीचे कालबध्द आदेश बजावले, कर्मचा-यांची वैद्यकीय बिले, भविष्य निर्वाह निधी बिले, या सारख्या आर्थिक बाबी देण्यास जाणून बुजून विलंब केला जातो व आर्थिक फायद्याची मागणी केली जाते.

पदोन्नतीची समितीची इतिवृत्त सहा महिने विलंबाने मंजूर करुन घेतली व पदोन्नती देण्यामध्ये अक्षम्य विलंब केलेला आहे. यासह अनेक गंभीर बाबी नागेश पाटील यांच्या विरुद्ध कृती समितीने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या निवेदनावर वाय. पी. कांबळे, निर्मल पवार, संजय उपरे, विजया राऊत, रोहिणी सुगंधी, श्रीकृष्ण घंटे आदिने सह्याचे पत्र दिले आहे.


ज्या समितीने सीईओ यांच्याकडे तक्रार दिल्या आहेत. त्या सर्व तक्रारीमध्ये तथ्य नाही. त्यामुळे हे सर्व मुद्दे बिनबुडाचे आहेत.
– नागेश पाटील, सहा. प्रशासन अधिकारी
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!