आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज अंतर्गत आळंदी ग्रामीण आरोग्य केंद्रात महाआरोग्य तपासणी शिबिरात ४०० रुग्नाची आरोग्य तपासणी करण्यात आली.
आळंदी ग्रामीण आरोग्य केंद्रात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी पुणे विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे डॉ. यशराज पी. पाटील यांच्या मार्गदर्शनात मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, विभाग प्रमुख डॉ. अमिताभ बॅनर्जी यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी ४०० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ श्यामकांत कुलकर्णी, डॉ योगेश कवाणे, जोसेफ चेरीयन यांच्या उपस्थितीत शिबिर पार पडले. यासाठी सर्व स्टाफ ने सहकार्य करून कॅम्प यशस्वी केल्याचे डॉ. श्यामकांत कुलकर्णी यांनी सांगितले.
Leave a Reply