आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदी पंचक्रोशीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी यात कला,क्रीडा, नृत्य , शिवभक्तीचे पोवाडे, शिवपूर्व काळ ते शिव राज्याभिषेख सोहळा नृत्याविष्कार, जनजागृती मिरवणुका, चित्र रथ, उंट, घोडेस्वार मावळे, विविध रंगभूषा करीत बालकांनी सादर केलेले कार्यक्रम लक्षवेधी होते. सामाजिक उपक्रमात रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार अशा उपक्रमांनी आळंदी पंचक्रोशीत तसेच विविध शाळांत शिवजयंती साजरी करण्यात आली. रस्त्याचे दुतर्फा लावण्यात आलेले भगवे झेंडे, लक्षवेधी मिरवणुकीने शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.
मनी विसरू शकला नाही, अजुनी काळही ज्यांची कीर्ती, अशी ती महाराजांची प्रतिमा, अशी ती महाराजांची मूर्ती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ध्यास फाउंडेशन संचालित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी प्रशालेत शिवजयंती उत्साही वातावरणात विविध उपकरणी साजरी झाली. श्रींचे पुतळा पूजन, आरती , शिवकालीन ते शिवराज्याभिषेख या काळातील प्रवास सादर करण्यात आला. यातील शालेय बाल कलाकारांचे लक्षवेधी नृत्य सर्वांचे मनाला भावले. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, विधितज्ज्ञ निलेश चौधरी, शिक्षणतज्ज्ञ, शालेय व्यवस्थापन समिती, महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी, ज्ञानेश्वर पाटील, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आरती विरकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य रोहिणी राखूनडे, गोपाळ उंबरकर, शामा कांदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत सत्कार, करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन, आरती करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी शिवजयंतीच्या उपक्रमाची माहिती विशद करून प्रशालेच्या वतीने होत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाची रूपरेषा देत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे गायन शासनदेश प्रमाणे होत असल्याचे सांगितले. शासन निर्णयाचे स्वागत देखील यावेळी करण्यात आले. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात इयत्ता चौथी व पाचवी मधील विद्यार्थ्यांनी शिवपूर्व कालखंड ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा प्रवास नृत्यातून प्रभावी पणे सादर केला.यास उपस्थित मान्यवर पदाधिकारी, पालक, शिक्षकांनी दाद दिली. यावेळी अर्जुन मेदनकर यांनी प्रशालेच्या विविध कलांचे, प्रशालेच्या कार्याचे कौतुक केले. विधितज्ज्ञ निलेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देत शिवचरित्र वाचनाचे आवाहन केले. प्रशालेच्या उपशिक्षिका विद्या खराडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मनिषा दरेकर यांनी केले.
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये दिमाखदार वातावरणात शिवजयंती ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शासन परिपत्रकानुसार (जय जय महाराष्ट्र माझा) या राज्य गीताचे गायन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे सदस्य सोपान काळे, विलास वाघमारे, धनाजी काळे, विश्वंभर पाटील, प्राजक्ता हरपळे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी अजित वडगावकर, दीपक मुंगसे, श्रीधर घुंडरे, विद्यार्थी ज्ञानेश्वर डोंगरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र व्यक्त करताना महाराजांचे आचार – विचार फक्त ऐकण्यासाठी नसून ते आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. राजा कसा असावा अठरापगड जाती – धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, जनसामान्य,भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करणारे, स्वराज्यातील रयतेवर आईच्या अंत:करणाने माया करणारे, प्रजावत्सल, लोककल्याणकारी, विज्ञानवादी, संवेदनशील मनाचे, सामान्य रयत आणि शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व, युद्ध कौशल्य आदी गुण, मूल्य व संस्कराविषयी विचार व्यक्त केले.
आळंदी सह्याद्री इंटरनॅशनल प्रशालेत शिवजयंती साजरी
येथील अभिनव एज्युकेशन सोसायटी संचलित सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणेश गरुड, उपाध्यक्ष सुरेश लोखंडे, खजिनदार सचिन मेथे, विनायक पितळे, मुख्याध्यापिका प्रियांका लांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी प्रथम छत्रपतींच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. राज्य गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. प्रशालेत विद्यार्थ्यांनी भोसले घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीच्या वेशभूषा सादर करून दाद मिळवली. ऐतिहासिक माहिती, जीवन परिचय छत्रपतींच्या कार्यांची विस्तृत माहिती यावेळी मुलांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित गाण्यांवर नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा दाखवणारे विविध प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केले प्रतापगडावरील पराक्रम यावर पोवाडा सादर करण्यात आला. गड आला पण सिंह गेला. कोंढाणा किल्ल्यावरील पराक्रम यावर आधारित नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. शिवाजी महाराज यांच्या जन्मा पासून त्यांचे बालपण, शिक्षण, स्वराज्याची शपथ, विविध पराक्रम शौर्य कथा ,राज्याभिषेकापर्यंत आधारित कार्यक्रम सादर करीत पालकांचे लक्ष वेधण्यात आले. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणेश गरुड यांनी मुलांशी व पालकांशी संवाद साधत शिवजयंती चे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्वामी संख्यायान सरस्वती यांनी इतिहासा बद्दल मुलांना, शिक्षकांना व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी मोठा जल्लोषात शिवजयंती उत्सव साजरा केला नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका लांडे, सोनाली शेळके, अश्विनी पवार, पूजा कोरे, सुचिता यादव, अर्चना भोसले, ऋतुजा खैरे, हर्षाली पाटील, पुनम जगताप, रूपाली वंजारी, नैना जाधव यांनी केले. सूत्रसंचालन चैताली महाजन यांनी केले.