मेहकर (अनिल मंजुळकर) – जानेफळ येथील श्री शिवाजी विद्यालयाच्यावतीने शिवजयंतीचे निमित्त साधून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ‘जय भवानी जय शिवराय ‘या स्फूर्तीदायी घोषणेने जानेफळ परिसर दणाणून सोडला होता. गावातील विविध चौकाचौकांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या नृत्य कलेचे प्रदर्शन केले. त्यामध्ये बंजारा नृत्य, लेझीम नृत्य, दिंडी नृत्य, सैनिक नृत्य व देवीच्या गाण्यावरील नृत्य गावातील चौकाचौकांमध्ये सादर करण्यात आले. वारकरी वेशातील विद्यार्थी, सैनिकी वेशातील विद्यार्थी, विविध मावळ्यांच्या गणवेशातील विद्यार्थी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज व त्यांची इतर मावळे, पालखीमध्ये सजवलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ व इतर स्त्री नाईका सर्वांचे मन वेधून घेत होत्या. गावातील नागरिकांनी विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच सवडतकर गल्लीमध्ये या विद्यार्थ्यांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूणच जानेफळातील वातावरण शिवमय झाले होते. या शोभायात्रेत महिलांची विशेष उपस्थिती होती. या शोभा यात्रेमध्ये संस्थेचे अध्यक्ष सागर देवकर, संचालक गजानन वडनकर, गजानन शिंदे, राजेश ठाकरे, पत्रकार अनिल मंजुळकर, अनिल काटे, सतिश जाधव, वाळके सर तसेच मुख्याध्यापक रत्नाकर गवारे, चांगाडे सर, गवई सर, काळे सर, शिंदे सर, देशमुख सर, सानप सर, पैठणकर सर, शेळके सर, चांदणे सर, छापरवाल मॅडम, देशमुख मॅडम, देवकर सर, विष्णू वाकळे, गजानन तोंडे, संतोष गुमटकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या शोभायात्रे बद्दल श्री शिवाजी हायस्कूलचे जानेफळसह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
——————-