ChikhaliVidharbha

माजी सरपंच दीपक केदार यांच्या प्रयत्नांने गुंजाळा गावकर्‍यांना मिळाले कायमस्वरूपी हक्काचे व्यासपीठ!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – ग्रामीण भागात अनेक पुढारी खुर्चीकरीता अथवा पैसे खिशात घालण्यासाठी वाटेल ते करतात. मात्र इकडे मागील पाच वर्षांत सरपंचपदावर कार्यरत असलेले दीपक दशरथ केदार यांनी कठोर परिश्रम घेवून गावामध्ये बौध्द आणि वंजारी समाजासाठी कायमस्वरुपी एक मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यामुळे त्यांचे गावकर्‍यांकडून कौतुक केले जात आहे.

चिखली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गुंजाळा गावाची लोकसंख्या दीड ते दोन हजाराच्या जवळपास असून, या गावामध्ये पन्नास टक्के बौध्द समाज आणि पन्नास टक्के वंजारी समाजाचे वास्तव्य आहे. पूर्वीपासून गावात दोन्हीं समाज बांधव मिळून मिसळून राहत असल्याने दोन्हीं समाजात एकोपा टिकून आहे. अशा या गावांमध्ये मागील पाच वर्षांच्या काळात सरपंच पदावर कार्यरत असलेले दीपक दशरथ केदार यांनी खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच वरिष्ठ शासकीय कार्यायांमध्ये जावून गावकर्‍यांसाठी कायमस्वरूपी हक्काचे एक व्यासपीठ मिळवून दिले. त्यामध्ये लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व सभामंडप, लोकवर्गणीतून भव्यदिव्य मारूतीचे मंदिर बाबासाहेब आंबेडकर व मंदिर एकालाएक लागून आहे. त्याच प्रमाणे गावकर्‍यांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत होते.

त्यासाठीही गावाला लागून एक एकर जमीन बौध्द समाजाच्या नावावर करुण दिली, तसेच बौध्द समाजाला बसण्यसाठी बुध्द विहार नसल्याने एक मुख्य ठिकाणी बुध्द विहारासाठी विहार बाधून दिले. असे एकापाठोपाठ पाच वर्षात करोडो रुपयांची विकास कामे केली असल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत होवून गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यासाठी माजी सरपंच दीपक केदार, ग्रामपंचायत सदस्य सुभाष खिल्लारे, गजानन केदार, अच्युत पवार, सुधाकर वनवे, निवास मोरे, पत्रकार प्रताप मोरे, बबन वाघमारे, सुनिल केदार, शिवाजी केदार, युवराज खिल्लारे, शाळा सभापती गजानन केदार, विठ्ठल केदार, रामप्रसाद केदार, विजायानंद मोरे, बबन मोरे, सिध्दार्थ गवई, दयानंद गवई, सुनील आटोळे, शंकर केदार, बाळू गावडे, एकनाथ केदार , योगेश थोरवे, प्रल्हाद केदार, दिपक केदार सर, देविदास डोईफोडे, शिवानंद केदार, योगेश नागरे, गजानन नागरे, भानुदास पवार, सुधिर मोरे, रामा मोरे, भिमा मोरे, प्रदीप मोरे, सागर मोरे, नितीन मोरे, संतोष पवार, अनिल पवार आदींचे दीपक केदार यांना मोठे योगदान लाभले असून, गावकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!