चिखली (तालुका प्रतिनिधी) – अनैसर्गिक संबंधापायी १० मेरोजी गांगलगाव येथे एका आरोपीने ३० वर्षीय कामगार तरुणाचा खून करून त्याचे प्रेत पेटवून दिले होते. त्यामुळे कुजलेल्या अवस्थेतील अनोळखी तरुणाचा तपास करुन व त्याचा खून करणारा आरोपी चार दिवसातच पकडून गजाआड केल्यामुळे १० फेब्रुवारीरोजी अमरावतीचे विशेष पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) यांनी अंढेरा ठाणेदारांसह पोलीस कर्मचार्यांचा प्रशस्ती पत्र देवून गौरव करण्यात आला.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या गांगलगाव येथे गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रामकृष्ण आश्रमाच्या पाठीमागील कुपनाच्या शेजारी एका ३० वर्षीय तरुणाचा पेटवून जाळून टाकलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र संशयित आरोपीच्या सांगण्यावरून तपासाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. त्यामुळे पोलिसांना जळालेल्या अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, एचडीपीओ, एलसीबीचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश हिवरकर यांनी गुपीत तपास पथकाद्वारे तपासाची चक्रे फिरवीत सीसीटीव्ही फोटोजद्वारे मृतकाचा फोटो व्हायरल केला. त्यामध्ये मृतक शिवाजी बोबडे नावाचा व्यक्ती असल्याचे समजले. परंतु, या नावाच्या व्यक्तीचे बुलढाणा, जालना, अकोला येथे जावून चौकशी केली असता शिवाजी बोबडे या नावाचे १२ व्यक्ती आढळून आले. मात्र अचानक पोकॉ दराडे यांना अकोलावरून एका शिक्षकांचा फोन आला की या अनोळखी तरुणाला मी ओळखतो. असे सांगताच त्यांना सीसीटीव्हीचे फोटोज पाठविले असता त्यांनी सांगितले का,r हा इसमाची सासुरवाडी किनगावजट्टू असून तो राहणारा चित्तेगाव औरंगाबाद येथील रहिवासी आहे, आणि तो सासुरवाडीत राहत होता. पोलिसांनी किनगावजट्टू येथील मृतकाच्या सासर्यांना फोटो दाखविले असता लगेच त्यांनी कबुली दिली की हे माझे जावई आहेत. मात्र ते माझ्या मुलीला व त्याच्या दोन मुलांना सोडून गेला आहे.
अशी ओळख पटल्याने पोलिसांनी चिखली आणि गांगलगाव येथील सीसीटीव्ही फोटोजची पाहणी केली असता, फोटोमध्ये ताब्यात असलेला संशयित आरोपी रहिश शेख व मृतक शिवाजी बोबडे हे दोघे सोबत जातांना येतांना दिसून आले. तेव्हा ताब्यातील संशयित आरोपीचा व मृतकाचा फोटो गावकर्यांना दाखविला असता सर्वांनी हाच तो अशी ओळख दिली. त्यामुळे आरोपीची कसून चौकशी करताच आरोपीने कबूल केले की, आमच्या दोघांच्या बायका सोबत नाहीत, कामासाठी मजूर शोधत असतांना मृतक बोबडे याला कामाची गरज होती म्हणून त्याला कामासाठी गांगलगाव येथील रामकृष्ण आश्रमात आणले. गेल्या काही दिवसांपासून सोबत राहणे, दारू पिणे, सोबत झोपणे, गावातील दुकानात उधारी करणे, असे सुरू होते. मात्र १० मे रोजी रात्री आम्ही सोबत झोपलो असता रशीद शेख यांने बोबडे सोबत अनैसर्गिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि शेख रशीद याने रागाच्या भरात बोबडेचा गळा दाबून संपविले. आता मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मंदिराच्या पाठीमागे बोबडे याला उचलून कचर्यात फेकुन कचरा पटवून टाकण्याची कबुली दिली. दुय्यम ठाणेदार वासाडे यांच्या तक्रारीवरून आरोपी रशीद शेख यांच्या विरुद्ध कलम ३०२, २०१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. असा चारच दिवसात तपास लावल्याने अमरावतीचे डीआयजी यांनी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांना प्रशस्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे, पोहेकॉ पोफळे, सिरसाट, झिने, सोनकांबळे, फुसे, पोफळे, राठोड, दराड, ठाकूर, जाधव, पोहरे यांचा सन्मान करण्यात आला.