आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील मेदनकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शालेय मुलांना सामाजिक बांधिलकीतून युवा उद्योजक अजित मेदनकर यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या पत्नी शितल मेदनकर यांनी लिहिलेले दिपस्तंभ हे पुस्तक विद्यार्थ्यांना मोफत वाटप करून वाचन संस्कृती जोपासण्याचे कार्यास बळ दिले. वाढदिवसा निमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शालेय मुलांना पुस्तके मोफत वाटप करण्यात आली.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ, अमित मेदनकर, विजय मेदनकर, गणेश मेदनकर, गणेश वाजे, शंकर मेदनकर, संजय मेदनकर, श्रीमती शकुंतला मेदनकर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका बेदरकर, जयश्री काळे, तुकाराम कुटे आदीसह शिक्षक, नागरिक उपस्थित होते. यावेळी व्हिएवढं मान्यवरांनी मनोगते व्यक्त करीत शालेय मुलांना मार्गदर्शन केले. तुकाराम कुटे यांनी आभार मानले. उपक्रमाचे संयोजन शितल मेदनकर यांनी केले.