Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

सोलापूर जिल्हात तीन लाख बालकांची आरोग्य तपासणी

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हात तीन लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ‘जागृत पालक सुदृढ बालक’ अभियान प्रभावीपणे राबवा, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

पंढरपूर तालुक्यांतील सिध्देवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात आज जागृत पालक सुदृढ बालक अभियानाचा शुंभारंभ सीईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करण्यात आला. अंगणवाडी व प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आज जि. प. सदस्य वसंतराव देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधिकारी शुभांगी गुंजाळ, सरपंच रोहिणी सारंग जाधव, विठ्ठलचे संचालक दशरथ जाधव, दिपक भालेकर, प्रगतशील बागायतदार बालाजी जाधव, सदस्य रमेश बनसोडे, आप्पा जाधव, संतोष जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात अंगणवाडीतील ३ लाख बालके व प्राथमिक शाळेतील किमान चार लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या प्रसंगी बोलताना सीईओ स्वामी म्हणाले, जिल्ह्यात जागृत पालक व सुदृढ बालक अभ्यास राबविण्यात येत आहे. ९ फेब्रुवारी पासून याची जिल्हयात अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. श्रम संस्कारामुळे युवकांवर चांगले संस्कार होतात. या शिबीरामुळे युवकांचा व्यक्तीमत्व विकास होण्यास मदत होणार आहे. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी शुभांगी गुंजाळ, दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर , कोरोना काळात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल सरपंच जाधव तसेच, विलास भोसले सरकोली, कार्यक्रम अधिकारी चौधरी, तसेच आँलिम्पिक सुवर्णपदक विजेती पुजा दिगंबर घुले या युवतीचा नागपूर येथे सेपतटकरा या प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल सिईओ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सिध्देवाडी येथील मातांचा सत्कार आंबेचे रोप देऊन सीईओ स्वामी यांनी सत्कार केला. सीईओ स्वामी यांचा सत्कार सारंग जाधव यांचे हस्ते करणेत आला. या प्रसंगी अंगणवाडी सैनिकांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या वर पथनाट्य सादर केले. या प्रसंगी बेबी केअर किट चे वाटप सीईओ स्वामी यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!