Breaking newsMumbaiPolitical NewsPolitics

बंडखोरांनी समोर येवून सांगावं मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे – उद्धव ठाकरे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्रात पॉलिटीकल ड्रामा सुरूच असून .शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे अनेक नेते आसाममधील गुवाहाटी येथे आहेत . मात्र अद्यापही शिंदे यांचे बंड थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधत बंडखोरांना आव्हान केले असून जर तुम्हाला मुख्यमंत्री पदी मी नको असेल तर मला समोर समोर येवून सांगावे मी आताच मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे अशी भावनिक हाक दिली. त्यामुळे आता बंडखोर आमदार नेमके काय पाऊल उचलतात याकडे लक्ष लागून आहे. 

 

 

उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करावी व सरकार बनवावे, अशी या बंडखोरांची मागणी आहे. ती पूर्ण होण्याची शक्यता धुसर असून, आता महाविकास आघाडी काय पाऊले उचलते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सरकार अल्पमतात आणून पायउतार करणे व सत्ता स्थापनेचा दावा करणे, अशी खेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खेळू शकतात. शिंदेंच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात असल्याचे आता जवळपास उघडच झाले आहे. कारण, बंडखोरांना घेऊन भाजपनेते मोहित कंबोज हे गुवाहाटीला रात्री रवाना झाले होते.

 

राज्यात कालपासूनच राजकीय भूकंप आला असून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत अपक्षासह 40 आमदारांना प्रथम सुरत येथे नेले या सर्व आमदारांचा बंड शमविण्यासाठी कालच शिवेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह आमदार रवींद्र पाठक हे सुरत येथे जाऊन शिंदे यांच्याशी चर्चा केली. अनाई परत या व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली

मात्र यावेळी शिंदे यांनी साफ नकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे याच्याशी फोनवरून चर्चा केली व मुंबईत या भेटून बोलू असे ठाकरे यांनी म्हटले . मात्र या हाकेल शिंदे यांनी साफ नकार देत काही अटी घातल्या. शिंदे यांनी दिलेल्या अटीना मुख्यमंत्र्यांनी साद दिली नाही. त्यामुळे मिलिंद नार्वेकर व आ.पाठक हे खाली हात परत आहे. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप सुरूच होता . या बंडखोर आमदारांना गुजरात पोलिसांनी चोख सुरक्षा दिली होती याच दरम्यान आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडली होती. रात्री उशिरा सर्व आमदार सुरत वरून गुवाहाटी येथे दाखल झाले

रात्री दोन वाजता विशेष विमानाने गुवाहाटी येथे पोहोचलेल्या बंडखोरांची पुढील बडदास्त आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे करणार आहेत. तेथे भाजपचे सरकार असून, हिमंत बिस्वा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसमध्ये त्यांना आता लीड रोल मिळालेला आहे. सर्व राजकीय घडामोडी सुरूच असताना आज सकाळी काँगेस नेते कमलनाथ यांनी काँगेस व राष्ट्रवादी पाठिंबा असल्याचे सूतोवाच केले . राज्यात काँगेस , राष्ट्रवादी यांच्या बैठका सुरूच होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांनी ऑनलाईन बैठकीला हजेरी लावली तिकडे गुवाहाटी मधे शिंदे यांनी प्रतोद पदी आमदार गोगावले यांची नियुक्ती करून तसे पत्रही उपसभापती यांना पाठवले. व त्या पत्रात भाजप सोबत युती करावी यासह अनेक मुद्दे मांडले. संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह वरून सवांद साधत कोरोना काळात कोणताही अनुभव नसताना प्रशासन व आपल्या सहकार्याने लढलो . आणि झालेल्या सर्व्हे मधे देशातून टॉप पाच मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर ज्यांनी आरोप केला की मुख्यमंत्री भेटत नाही .हो मी नाही भेटलो कारण माझ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र तरीही मी हॉस्पिटल मधून मंत्री आमदार खासदारांची बैठक घतेली होती. तर काहींनी शिवसेनेने हिंदुत्व सोडले का? हीच बाळासाहेबांची शिवसेना का? असे प्रश्न उपस्थित केले. विधान परिषदेच्या वेळी कोण कोण कुठे गेला. हा कुठे गेला. आपल्याच माणसावर शंका होती मी तर म्हणतो की लघुशंकेसाठी गेला तरी शंका असे वातावरण होते. 2019 मधे जेव्हा तिनेही पक्षाची बैठक झाली तेव्हा शरद पवारांनी मला मुखमंत्री व्हावे असे सांगितल. आणि सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकला मात्र आपल्याच आमदारांना माझ्यावर विश्वास नाही आजही त्यांनी म्हणजेच काँगेस व राष्ट्रवादीने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. जर तुम्हाला मी मुख्यमंत्री नको हवा तर तुम्ही मला समोर येवून सांगायला हव होते , सूर्त5 किंवा इतर ठिकाणी जाऊन सांगायची गरज नाही . बंडखोर आमदारांनी आताही मला सांगावं मी मुख्युमंत्री नको असे असेल तर मला समोर येवून सांगावं मी आताच मुख्यमंत्री पद सोडतो. तसेच पक्ष प्रमुख पद ही सोडायला तयार आहे. फक्त तुम्ही समोर येवून सांगावा फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मी माझा राजीनामा तयार ठेवतो तुम्हीच राज्यपालाना नेवून द्या असे आवाहनही केले आहे. समोर काय घडामोडी याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे तर भाजप कडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!