बुलडाणा(जिल्हा प्रतिनिधी) ट्रक चालकाने त्याचा ताब्यातील ट्रक निष्काळजीपणाने रात्रीच्या अंधारात इंडिकेटर चालू न ठेवता रस्त्यावर उभा केला. अंधारात रस्त्यावर ट्रक उभा असल्याने दुचाकीस्वारांना ट्रक न दिसल्याने दुचाकी ट्रकवर आदळली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार झाले ही घटना घटना २१ जून च्या चिखली देऊळगाव राजा मार्गावरील बेराळा शिवारातील योगीराज हॉटेल समोर रात्री घडली
चिखली तालुक्यातील पवन विष्णू भालेकर व योगश शामसुंदर साप्ते हे दोघे २१ जून रोजी बेराळा फाटा येथून मलगी कडे दुचाकी क्रमांक एमएच २८ एक्स ८८०२ ने जात होते. दरम्यांन चिखली देऊळगाव राजा मार्गावरील बेराळा शिवारातील योगीराज हॉटेल समोर ट्रक क्रमांक एम एच ४६ – ००३० च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक रस्त्यातच उभा करून ठेवला. यावेळी ट्रक चालकाने रात्र असून सुध्दा ट्रकचे इंडीकेटर सुरु ठेवले नाही. २१ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास दुचाकीने जाणारे पवन भालेकर व योगेश साप्ते यांना इंडिकेटर बंद असल्याने रस्त्यात उभा ट्रक दिसला नाही.त्यामुळे दुचाकी ही ट्रकवर आदळली. या अपघातात पवन भालेराव व योगेश साप्ते यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर घटना घडताच ट्रक चालक हा घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलिस कर्मचारयांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. तर याप्रकरणी सुखदेव हरीभाऊ भालेकर यांनी पोस्टेला तक्रार दिली करी ट्रक क्रमांक एम एच ४६ – ००३० च्या चालकाने हायवे रोडवर वाहतुकीस अडथळा होईल अशा धोकादायक स्थितीत निष्काळजीपणे ट्रक उभा करून वाहनाचे इंडिकेटर बंद ठेवले त्यामुळे उभा ट्रक न दिसल्याने दुचकाी ट्रक ला धडकली व झालेल्या अपघातात पवन भालेकर व योगेश साप्ते या दोघांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी होऊन दोघांचे मरणास कारणीभूत झाला आहे अपघात झाल्यानंतर ट्रक चालक हा ट्रक सोडून पळून गेला आहे. यावरून चिखली पोलिसांनी ट्रक क्रमांक एम एच ४६ – ००३० च्या चालकाविरुध्द कलम २७९, ३०४, २८३, ४२७, १३४ चा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रकाश बाजार हे करीत आहेत