Breaking newsMumbaiPolitical NewsPolitics

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार की विधानसभा बरखास्त करणार??

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्राचा पॉलिटीकल ड्रामा कालपासून सुरु आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीचे एकूण ४० आमदार फोडल्याचे दिसून आले. हे सर्व ४० बंडखोर मंगळवारी रात्री उशिरा सुरतमधील हॉटेलमधून निघून आसाममधील गुवाहाटीकडे विशेष विमानाद्वारे रवाना झाले. या ४० जणांना शिवसेनेचे ३३ तर अन्य ७ अपक्षांचा समावेश आहे. मात्र अद्यापही शिंदे यांच्या कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने आता शिवसेनेत खिंडार पडल्याचे सिद्ध झाले असून आता ही भापचे लोटस ऑपरेशन आहे की काय? मात्र नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली . उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्याने त्यांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थिती लावली . या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असूूून काँगेस व राष्ट्रवादी  हेे महाविकास आघाडी सोबत  असल्याचे कमलनाथ याांनी  सांगितले ?  संजय राऊत यांचे ट्वीविट आणि आदित्य ठाकरे याांनी त्याांचा ब्लॉग वरून    पर्यटन मंत्री हे दोन शब्द काढून टाकले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार की विधानसभा बरखास्त करणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे

 

 उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करावी व सरकार बनवावे, अशी या बंडखोरांची मागणी आहे. ती पूर्ण होण्याची शक्यता धुसर असून, आता महाविकास आघाडी काय पाऊले उचलते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सरकार अल्पमतात आणून पायउतार करणे व सत्ता स्थापनेचा दावा करणे, अशी खेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खेळू शकतात. शिंदेंच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात असल्याचे आता जवळपास उघडच झाले आहे. कारण, बंडखोरांना घेऊन भाजपनेते मोहित कंबोज हे गुवाहाटीला रात्री रवाना झाले होते.

 

राज्यातही शिवसेनेचे उर्वरित आमदार फुटू नये, याची काळजी घेत सर्व आमदारांना लोअर परेळ येथील एका रिसॉर्टमध्ये हलविण्यात आले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुरक्षित असून, सत्ता स्थापन करताना महाविकास आघाडीकडे १६२ आमदार होते. आता त्यांच्याकडे १२२ आमदार राहिल्याने हे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे संवैधानिक तरतुदींचा आधार घेत, देवेंद्र फडणवीस हे काय खेळी करतात, यावर आता ठाकरे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. ‘उद्धव ठाकरे यांना गाफील ठेवून, त्यांच्या पाठीत बंडखोरांनी जोरदार खंजीर खुपसला असून, या धक्क्यातून सावरणे शिवसेनेला गरजेचे’ असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ नेतृत्वाने दिली आहे.

रात्री दोन वाजता विशेष विमानाने गुवाहाटी येथे पोहोचलेल्या बंडखोरांची पुढील बडदास्त आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे करणार आहेत. तेथे भाजपचे सरकार असून, हिमंत बिस्वा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसमध्ये त्यांना आता लीड रोल मिळालेला आहे.

 

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आम्ही भाजपमध्ये सहभागी होणार नसल्याचे पत्रकारांना सांगितले. पण, त्यांची सर्व स्क्रिप्ट कुणी तरी तयार करून देत असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत तातडीने युती करावी, अशी आपली मागणी असून, आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही तरी चालेल, असे शिंदे यांनी सांगितले. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक असून, पक्षाशी गद्दारी करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे या बैठकीला उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते कारण त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या बैठकीत काय निर्णय झाला आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर, शरद पवार हेदेखील मुंबईत परतले आहेत. हे सरकार पडणार नाही, अशी ग्वाही पवारांनी दिली

 असल्याने आता ते काय राजकीय खेळी करतात, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी पत्रकारांशी बोलतांना काँग्रेस व राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी सोबत असल्याचे सांगितले. तूर्त तरी देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून सर्व खेळी करत असून, ऐनवेळी ते मैदानात उतरतील, असे त्यांच्या निकटवर्तीय सूत्राने सांगितले. उद्धव ठाकरे यांना ते विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान देतील. मात्र खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून विधानसभा बरखास्तीचा संकेत दिले आहे तर आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर ब्लॉग वरून पर्यटन मंत्री हे दोन शब्द हटविले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील की विधानसभा बरखास्त करतील ? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!