GuvahatiPolitical News

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल?जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल संजय राऊतांचे वक्तव्य !

गुवाहाटी(ब्रेकींग महाराष्ट्र न्यूज)- महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल, चर्चा चालू असतांना शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी जास्तीत जास्त काय होईल, महाराष्ट्रातील सत्ता जाईल राऊतांचे हे वक्तव्य म्हणजे उध्दव ठाकरे सरकारजवळ पुरेसे संख्याबळ नसल्याने महाराष्ट्रातील सरकार पडणार असल्याचे सूचक वक्तव्यच राऊत यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा असून त्यांनी व्टीटर हॅण्डलवरुन त्यांनी मंत्रीपदाचा उल्लेख काढला असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देतील, हे जवळपास निश्चीत झाले आहे.
  महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार संख्याबळामुळे धोक्यात आली असून सरकारकडे पुरेशी संख्याबळ नसल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे केव्हाही राजीनामा देवू शकतात, त्याला कारणही तेवढेच मोठे आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे 46 पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ असल्याचा ते दावा करीत असल्याने ती आकडेवारी पाहता ठाकरे सरकार शिंदेसमोर हतबल झाले आहे. दरम्यान शिवसेनेचे बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांनी धमकी देवून पळविल्याचा आरोप करीत सुरत येथे कैद करुन ठेवल्याचे प्रसार माध्यमांना सांगितल्याने घटनेला वेगळेच वळण मिळाले आहे. आमदारांना धमकावून नेल्याचा आरोप 21 जून रोजी संजय राऊत यांनी केला होता. सध्या मुंबई येथील वाईबी चव्हाण सेंटर येथे काँग्रेसचेनेते कमलनाथ व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरु असून त्यामध्ये काय होईल, हे स्पष्ट होईलच. परंतु सध्यातरी शिंदेसमोर शिवसेनेने हार मानल्याने महाराष्ट्रातील सरकार पडणार असल्याचे जवळपास निश्चीत झाले आहे. सध्या एकनाथ शिंदे गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये असून त्यांच्याकडे 46 आमदार असल्याचे दावा शिंदे यांनी केला असून आज सायंकाळ 6 वाजेपर्यंत सर्व परिस्थीती स्पष्ट होईल. आता शिवसेनचे आमदार गुलाबराव पाटील हे सुध्दा गुवाहाटीकडे निघाल्याची विश्वसनीय माहिती आहे. सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मोठ्या दिग्गजांनी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी सरकारला कोण वाचवू शकते, हे मात्र लवकरच स्पष्ट होईल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!