MaharashtraMarathwada

मुलींच्या शिक्षणासाठी येणार्‍या लालपरीला खड्ड्यांचा आहेर!

पैठण (प्रतिनिधी) – तालुक्यातील गेवराई मर्दा ते चौफुली या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.  रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता,  अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  रस्त्याच्या साइडपट्ट्या मागच्यावर्षीच्या पावसाने खचल्या आहेत.  तसेच रस्ता अरुंद झाला आहे.  रस्त्यावरील डांबर गायब झाले असून,  मोठमोठे खड्डे पडले आहेत.  एक किलोमीटर रस्त्यावरून जाताना व वाहनचालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

गेवराई गावच्या चौफुलीपासून असणाऱ्या हद्दीतील म्हणजेच गावापर्यंत एक ते दीड किलोमीटरचा वळणाचा रस्ता आहे.  वेडीवाकडी वळणं आहेत.  या रस्त्यावरून वाहनांची गर्दी असते.  या भागाकडे जाणाऱ्या शालेय बस या वाहनांची जास्त प्रमाणात दयनीय अवस्था आहे.  तसेच गेवराई मर्दा ते चौफुली या दीड किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून,  मोठमोठे खड्डे पडले आहेत.  तसेच साइडपट्ट्या खचल्या आहेत.  वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.  या वर्षीच्या थोड्याच पावसाने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.  गेवराई मर्दा ते चौफुली रस्त्यावर काही दिवसांपूर्वी मोठे खड्डे झाले असून,  जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला गेवराई मर्दा ते चौफुली या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कल्पना नाही व पाठपुरावाही नाही बांधकाम विभागाला कोणतीही सूचना केल्याचे दिसून येत नाही.  या खड्यात अपघात झाल्यावर कुणाचा तरी जिव गेल्यावर जाग येणार का? असा सवाल जनतेतून निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!