Breaking newsHead linesPoliticsWomen's WorldWorld update

राष्ट्रपती पदासाठी मोदी सरकारचे ‘आदिवासी कार्ड’!

नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – देशाच्या पुढील राष्ट्रपती पदासाठी सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने आदिवासी कार्ड खोलले आहे. भाजपने माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मंगळवारी भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मुर्मू या २५ जूनरोजी आपले नामांकन दाखल करणार आहेत.
मूळच्या ओडिशाच्या रहिवासी असलेल्या मुर्मू यांनी यापूर्वी झारखंडच्या राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे. ओडिशातील मयूरभंज हे त्यांचे मूळ गाव तर रायरंगपूर येथून त्या आमदार राहिल्या आहेत. त्या निवडून आल्या तर देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरणार आहेत. दुसरीकडे, विरोधकांनी तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांच्या नावार सहमती दर्शविली आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!