Breaking newsBuldanaMaharashtraVidharbha

जळगाव जामोद पोलिसांनी २ देशी कट्टयासह दोघे जेरबंद

 

 

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी)जळगाव.जामोद ह पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर व त्यांच्या पथकाने १६ जून रोजी ज.जामोद पोस्टे. हद्दीमध्ये नाकाबंदी करीत असतांना संशयास्पद तवेरा गाडीतील सातारा जिल्ह्यातील ४ तडीपार गुंडांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून २ देशी पिस्टल व ६ लाख १५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर सोमवार २० जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे जळगाव जामोद येथील आकाश उर्पâ सोनू सावतकर व अवतारसिंग खिच्ची या दोघांकडून आरोपींकडून २ मोटार सायकल, २ पिस्टलसह ९ जिवंत काडतूस असा एवूâण १ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे जळगाव जामोद येथील आकाश उर्फ सोनू भारत सावतकर (वय २६) रा.खेर्डावेस ज.जामोद देशी कट्टा असल्याच्या माहितीवरुन त्याला पकडून त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मोटारसायकल मध्ये लपवलेली देशी पिस्ट व दोन काडतूस काढून दिल्या. त्याला विश्वास घेवून पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याने सदरचा देशी कट्टा त्याने अवतारसिंग अमरसिंग खिच्ची (वय ३८) रा. पाचोरी मध्यप्रदेश याचे कडून घेतल्याची माहिती देत मंगळवार २१ जून रोजी देशी पिस्टल घेवून येणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचून निमखेडी ते सुनगाव रोडवर नर्सरी नाल्याजवळ सापळा रचून पहाटे-पहाटे त्यास गजाआड करुन त्याच्या ताब्यातून १ देशी पिस्टल, दोन मोटार सायकली, ९ जिवंत काडतूस असा एकूण १ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी आकाश उर्फ सोनू भारत सावतकर व अवतारसिंग अमरसिंग खिच्ची या आरोपीविरुध्द शस्त्र अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपीस २४ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, खामगाव अप्पर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त, मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली ज.जामोद ठाणेदार सुनिल अंबुलकर, सपोनी सागर भास्कर, पोउपनिरीक्षक किशोर घोडेस्वार, रंजना आवारे, नामदेव सरकटे, पोहेकाँ. निलेश पुंडे, संजय राऊत, नापोका. उमेश शेगोकार, नापोकाँ.अनिल सुशिर, अतुल मोहाडे, शेख इरफान, पोकाँ.अमोल वनारे, सचिन राजपूत, भारत बोंद्रे, मंगेश सोळंके, चालक पोकाँ. योगेश माळी, पोकाँ.डब्बे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!