मिसाळवाडीचे युवा नेतृत्व हनुमान मिसाळ यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
– चिखली तालुक्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या हनुमान मिसाळ यांना भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा!
चिखली (विशेष प्रतिनिधी) – मिसाळवाडीचे लोकप्रिय युवा नेतृत्व तसेच बिनविरोध उपसरपंचपदाचे दावेदार हनुमान मधुकर मिसाळ यांच्यावर वाढदिवसानिमित्त आज सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निकटवर्तीय तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनी पेढा भरवून हनुमान मिसाळ यांचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हनुमान मिसाळ यांना शुभेच्छा देण्यासाठी अख्खे गाव लोटले होते. तालुक्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी भ्रमणध्वनीद्वारे हनुमान मिसाळ यांना शुभेच्छा दिल्यात.
मिसाळवाडी गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. या निवडणुकीत हनुमान मिसाळ हे सरपंचपदासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. गावातील त्यांची लोकप्रियता पाहाता, निवडणूक झाली असती तर कदाचित निकाल वेगळा लागण्याचीही शक्यता होती. परंतु, ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आणि विविध क्षेत्रात नावाजलेल्या गावातील भूमिपुत्रांनी दबाव निर्माण केल्याने सत्ताधारी व विरोधक एकत्र बसले व त्यांनी आपआपसात तडजोडी केल्यात. त्यानुसार, सरपंचपदी विद्यमान सरपंच बाळू तथा विनोद पाटील यांना पुन्हा संधी देण्याचे निश्चित झाले तर, उपसरपंचपदी हनुमान मिसाळ यांना संधी देण्याचे निश्चित झाले. तसेच, सदस्यांच्या जागावाटपातही एकमेकांना समसमान जागावाटप झाले. त्यामुळे कोणत्याही राजकीय संघर्षाशिवाय ग्रामपंचायत बिनविरोध पार पडली असून, सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले आहे.
आज हनुमान मिसाळ यांचा वाढदिवस असल्याने, त्यांना सर्व व्हाटसअप ग्रूपवर शुभेच्छांचा महापूर आला होता. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनी स्वतः मिसाळवाडीत येऊन त्यांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी त्यांच्यासोबत शेळगाव आटोळचे ग्रामपंचायत सदस्य बाजीराव देशमुख, शेळगाव आटोळचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष शरद गावडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या शिवाय, चिखली व बुलढाणा जिल्ह्यातील अनेक महत्वाचे नेते, प्रमुख अधिकारी यांनीदेखील भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्यात. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ग्रूपचे मुख्य संपादक तथा ‘ईव्ही डील’ या इलेक्ट्रीक व्हेईकल्स व चार्जिंग स्टेशन्स निर्मिती व पुरवठा कंपनीचे सीईओ पुरुषोत्तम सांगळे यांनीदेखील भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्यात. यानिमित्त मिसाळवाडी येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हनुमान मिसाळ यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.
हनुमान मिसाळ यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी!
मिसाळवाडीचे युवानेते हनुमान मिसाळ यांच्यावर लवकरच महाराष्ट्रातील बलाढ्य मराठा संघटना असलेल्या संघटनेची जिल्हा पातळीवरील महत्वाची जबाबदारी येणार असून, मराठा आरक्षण, मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थी, गरीब शेतकर्यांच्या घरातील लग्नाळू मुले-मुली यांना आर्थिक सहाय्य, शेतकरी व उपेक्षित समाज बांधवांच्या मदतीसाठी त्यांना संघटनात्मक पातळीवर ताकद देण्याचा निर्णय मुंबई येथील एका महत्वपूर्ण बैठकीत झालेला आहे. त्यामुळे पुढील काळात मिसाळवाडीचे नाव ते जिल्हा पातळीवर पुढे तर नेणार आहेच; पण महाराष्ट्रातदेखील आपले नेतृत्व सिद्ध करणार आहेत. सद्या ही मराठा संघटना सत्ताधारी पक्षासह प्रमुख विरोधकांतदेखील आपले वर्चस्व राखून आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरदेखील हनुमान मिसाळ यांना आपला दबदबा निर्माण करण्यासह मुंबईतील राजकीय वर्तुळात स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधीदेखील मिळणार आहे.
—————–