AalandiDehuMaharashtraPune

देहू, आळंदी पालखी मार्गावर विना परवानगी ड्रोनद्वारे छायाचित्रण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार!

पुणे(पिंपरी) तुकोबा आणि माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा नियोजित मार्ग तसेच लगतच्या परिसरात ड्रोन अथवा ड्रोनसदृश कॅमेऱ्याने छायाचित्रण करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. जर कोणी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराच पिंपरीचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे. तसेच पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला फुले, फळे, खेळणी विक्रेते, हातगाडीवाले, पथारीवाले यांना बसण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

  राज्यभरातून पालखी सोहळ्यानिमित्त देहू व आळंदी येथे लाखो वारकरी येत क्षेत्रातच ही गर्दी एकवटलेली असते. ड्रोन तथा इतर माध्यमातून या गर्दीचे छायाचित्रण होण्याची शक्ततेच्या पार्श्वभूमीवर वारीसाठी आलेले भाविक मुख्यत्वे ग्रामीण भागातून आलेले असून त्यांना ड्रोनविषयी त्यांना माहिती नसते. अचानक हवेत ड्रोन उडताना पाहून गैरसमजातून वारकऱ्यांमध्ये गोंधळ उडू शकतो. या पार्श्वभुमीवर 22 जूनपर्यत पूर्व परवानगी शिवाय छात्राचित्रण करण्यास पोलिस प्रशासनाने मनाई केली आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस बसणाऱ्या विक्रेत्यांना 23 जूनपर्यंत मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघटन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!