Breaking newsCrimeMaharashtraMarathwada

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार; मुरमा शिवारातील घटना

पाचोड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील मुरमा शिवारात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण गंभीररित्या जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि.१८)जून रोजी रात्री वाजेच्या सुमारास घडली.
दुनगांव ता.अंबड येथील प्रभाकर विष्णु उबाळे (वय ४०) हे आपल्या मुलीला सासरी सोडून परत दुनगांवला गावाकडे आपल्या दुचाकी क्र एमएच.२१.बी.जे. ९३४७ वरून येताना धुळे सोलापूर- राष्ट्रीय महामार्गावर पैठण तालुक्यातील मुरमा शिवारातील महावीर जिनिंग जवळ रात्री १० वाजेच्या दरम्यान औरंगाबादकडून बीड़कडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात प्रभाकर विष्णु उबाळे हे गंभीररित्या ज़ख्मी झाले. या घटनेची माहिती दुनगाव ग्रामस्थांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन खाजगी वाहनाने प्रभाकर उबाळे यांना उपचरासाठी औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, रात्री उशीरा उपचारदरम्यान प्रभार उबाळे याचा मृत्यु झाला आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!