बदलापूर : सोशल मिडीयावर ओळख झाली, ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. तरुणाने तरुणीशी प्रेमसबंध ठेवून लग्नाचे अमिष वेळोवेळी तिच्या शरीराचे लचके तोडले. दरम्यान तरुणीने लग्नाची गळ घातली असता, वेगळ्या जातीचे कारण सांगून लग्नाला नकार दिला. हा धक्का सहन न झाल्याने 24 वर्षीय तरुणीचे रेल्वेखाली उडी घेवून 16 जून रोजी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन कुळगांव-बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३०६, ३४ अन्वये आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरारच असल्याचा आरोपी तरुणीच्या नातेवाईकांनी केला.
कल्याण पश्चिम भागातील २४ वर्षीय तरुणीचे बदलापूर-कासगाव परिसरात राहणाऱ्या करण लहाने याच्यासोबत तीचे गेल्या पाच वर्षापासून प्रेमसंबध होते. दरम्यान करणने लहाने याने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीने लग्नाचे विचारल्यावर करणने जातीचे कारण दाखवून नकार दिला. यामुळे तरुणी फार खचली होती, दरम्यान तरुणीच्या कुटुंबियांनी करनच्या घरी जाऊन जाब विचारला असता त्याच्या कुटुंबियांनी तरुणीच्या पालकांना शिवीगाळ करत धमकी देऊन घरातून हाकलून दिले होते. हा अपमान सहन न झाल्याने कल्याणमध्ये राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर आत्महत्या केली. याप्रकरणी तरुणीच्या नातेवाईकांनी कुळगाव-बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कुळगांव-बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु चार दिवस उलटून देखील आरोपी फरार असल्याने तरुणीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
अशी झाली होती ओळख..
तरुणीची सोशल मिडीया इंस्टाग्रामवर बदलापुरातील करण लहाने याचेशी मैत्री झाली, या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान करणने तरुणीला लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मात्र, नंतर करणने जात वेगळी असल्याचे कारण पुढे करुन तरुणीला लग्नास नकार दिल्याने सदर तरुणीने खचून जावून आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी फिर्यादीत म्हटले आहे.