आळंदी / प्रतिनिधी : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे माजी व्यवस्थापक बंडोपंत कुलकर्णी ( वय ७३ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सन १९७२ पासून २०१४ पर्यंत त्यांनी ज्ञानेश्वर महाराज मंदिरात कामकाज पाहिले. पुजारी, शिपाई, लिपीक, व्यवस्थाप, पालखी सोहळ्यात विविध कामकाज तसेच मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आदी काम सेवाभाव जोपासत त्यांनी केले. सर्वाना बरोबर घेऊन त्यांनी सेवा दिली. त्यांचा मनमिळावू स्वभाव यामुळे परिसरात ते सर्व परिचित होते. भैरवनाथ मंदिरात त्यांनी सेवा निवृत्त झाल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम, अखंड हरिनाम सप्ताह, मंदिरातील विविध प्रथापरंपरांचे कार्यक्रम राबवून मोठ्या प्रमाणात अन्नदान व्हावे यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. त्यांचे जाण्याने आळंदी परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
Read Next
Aalandi
October 11, 2024
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान
Aalandi
October 9, 2024
पद्मावती देवी मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात
2 days ago
त्रिशंकु विधानसभेचे संकेत पाहाता, सरकार स्थापनेसाठी ‘महायुती’, ‘महाआघाडी’कडून ‘प्लॅन ए व बी’ही तयार!
2 weeks ago
अलंकापुरीत इंद्रायणी नदी घाटावर छठ पूजा परंपरेने साजरी
October 11, 2024
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान
October 9, 2024
पद्मावती देवी मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात
October 2, 2024
विश्वशांती विद्यापीठाचा “समर्पित जीवन गौरव पुरस्कार” गुरुवर्य ह.भ.प. विद्यावाचस्पती रविदास महाराज शिरसाठ यांना जाहीर
Leave a Reply