चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील शेतकर्यांनी अॅग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनी (एआयसी) यांच्याकडे शेतीपिकाचा विमा काढला होता. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात्मक भूमिकेनंतर राज्यासाठी पीकविमा रक्कम मंजूर झाला. परंतु चिखली तालुक्यातील शेतकर्यांच्या खात्यावर अत्यंत तोकडी मदत प्राप्त झाल्याने शेकडो शेतकर्यांसह विनायक सरनाईक व सत्येंद्र भुसारी यांनी कृषी विभाग गाठून कंपनीविरोधात शेकडो तक्रारी वैयक्तीक दाखल करण्यात आल्या आहेत. तर एका निवेदनाव्दारे भष्ट्राचाराची चौकशी करुण उर्वरीत शेतकर्यांना पिक विमा रक्कम अदा करावी, व तोकडी मदत मिळालेल्या शेतकर्यांची उर्वरीत रक्कम शासन नियमाप्रमाणे खात्यावर जमा करावी, अशी मागणी तालुका कृषी विभागाकडे दि. २९नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे.
जिल्हातील हजारो शेतकर्यांनी पिक विमा काढला आहे. चिखली तालुक्यातील ५० हजार शेतकर्यांनी सोयाबीन, तूर व इतर पिकाचा विमा काढला आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टि व सततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. असे असतांना राज्यातील त्याचप्रामाणे जिल्ह्यातील विमा धारक शेतकर्यांच्या नुकसानीपोटी विमा मंजूर करण्यात आला, याची रक्कमदेखील खात्यावर जमा करण्यात आली. परंतु अनेकांना तोकडी रक्कम मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यासाठी नेमणूक केलेल्या विमा कंपनीविरोधात आक्रमक पावित्रा घेत रविकांत तुपकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाचा शेतवर्यांसह ताबा घेतला होता. तर यामधे मोठे भ्रष्टाचार झाला असल्याचे शेतकर्यांच्या खात्यावर विमा रक्कम कमी दिल्याने उघड केले होते तर या कंपनीविरोधात कृषी विभाग व शेतकर्यांची फसवणूक केली असल्याची तक्रार पोलीस स्टेशन मधे दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, चिखली तालुक्यातील हजारो शेतक-यांनी विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात कृषी कार्यालय गाठत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे वैयक्तीक तक्रारी दाखल केल्या असून, न्याय न मिळाल्यास ग्राहक मंच्यात तक्रारी दाखल करण्याचे सांगत आंदोलन छेडण्याचा इशारासुद्धा दिला आहे.
—————-