– ‘अन्न हे परब्रह्म’ या विषयावरील पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन
चिखली (विशेष प्रतिनिधी) – स्थानिक, श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित ‘भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावरील व्याख्यानात श्री शिवाजी महाविद्यालय मोताळा येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. पुरुषोत्तम साठे यांनी जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, अशी माहिती दिली. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असली तरी, उपासमारीच्या निर्देशांकात भारताचे १०७ वे स्थान आहे. जर जागतिक बौद्धिक निर्देशांकात मात्र भारताने प्रगती केलेली आहे. गेल्या पाच वर्षात दहा अंकाची भरारी मारून भारत ४० वे स्थान नावर विराजमान झाला आहे. नवोपक्रम, परकीय थेट गुंतवणूक, विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती, नवनवीन पॅटर्न संशोधनामध्ये वृद्धी होत असली तरी, त्यामध्ये मोठी वाढ व्हायला हवी, असे मत त्यांनी प्रतिवादीत केले. त्यासोबतच भारतीय लोकांच्या दरडोई उत्पन्न सुद्धा वाढायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या व्याख्यानात प्रा. डॉ. वनिता पोच्छी उपस्थित होत्या. अतिथी व्याख्यानाच्या सुरुवातीला ‘अन्न हे परब्रह्म’ या विषयावरील पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. या प्रदर्शनीमध्ये अन्नाचे महत्त्व सांगणार्या २७ पोस्टर विद्यार्थ्यांनी सादर केलेत. या प्रदर्शनीचे परीक्षण प्रा. डॉ. इम्तीआज जूकलकर व प्रा. मीनल डिक्कर यांनी केले. यामध्ये प्रथम क्रमांक कु. भावना, द्वितीय क्रमांक कु. सुवर्णा सोळंकी तर तृतीय क्रमांक कु. नेहा जाधव तर प्रोत्साहन पर पारितोषिक एसपीएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. योगिता डब्बे हिला देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.सुनीता कलाखे तर आभार प्रा. शशिकांत पाटील यांनी मानलेत.
—————-