आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन, पुष्पहार अर्पण करीत पुष्पांजली वाहत जयंती विनम्र अभिवादनाने साजरी करण्यात आली.
आळंदी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे खजिनदार सुरेश नाना झोंबाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक करताना क्रांतिकारकांच्या कार्यास उजाळा देणे आवश्यक असल्याचे फाउंडेशनचे सचिव सूर्यकांत खुडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याची ओळख करून दिली. बाल दिना निमित्त पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील शिक्षक संजय उदमले, अमीर शेख, विठ्ठलदास गुट्टे, रामदास वहिले, राजाभाऊ पानगावकर, स्वप्निल रंधवे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव भोसले, सेवा निवृत्त पोलीस ज्ञानेश्वर तापकीर, धनंजय घोगरे, कपिल खुडे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार अमीर शेख यांनी मानले. सूर्यकांत खुडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.