BuldanaResultsVidharbha

मोताळा तालुक्याचा दहावीचा निकाल 96.66 टक्के

मोताळा- दहावीचा ऑनलाईन निकाल 17 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावर्षीही मुलींनी अमरावती विभागासह बुलडाणा जिल्ह्यात बाजी मारली आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी 97.16 टक्के असून मोताळा तालुक्याची टक्केवारी 96.66 एवढी आहे. तालुक्यातील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.04 टक्के एवढे असून मुलांची 95.52 टक्के असून तालुक्यात सुध्दा मुलींच अव्वल ठरल्या आहेत, तर 16 शाळांनी शंभरी गाठली आहे. तर सर्वात कमी निकाल कर्मवीर भिकनसिंग माध्यमिक विद्यालय निपाण्याच्या लागला असून त्याची टक्केवारी 71.42 टक्के एवढी आहे.

मार्च ते एपिल दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेसाठी मोताळा तालुक्यातील 1921 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती, त्यापैकी एकूण 1857 विद्यार्थी पास झाले असून त्यामध्ये 1003 मुले तर 854 मुली पास झाल्या होत्या. मुलांची टक्केवारी 85.52टक्के एवढी तर मुलींची टककेवारी 98.04 टक्के एवढी आहे. मोताळा तालुक्यातील 16 शाळांची 100टक्के निकाल लागला आहे. यामध्ये मोताळा तालुक्यातील शेलगाव बाजार येथील एडेड हायस्कूलचा निकाल 100टक्के लागला असून एकूण 19 विद्यार्थ्यापैकी 19 विद्यार्थी पास झाले आहेत. लिहा बु.येथील श्री जगदंबा विद्यालयाचा 100टक्के निकाल लागला असून 61 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली त्यापैकी 91 विद्यार्थी पास झाले आहेत. तळणी येथील जनता हायस्कूला निकाल 100टक्के लागला असून 32 पैकी 32 विद्यार्थी पास झाले, जवाहर उर्दू हायस्कूलचा निकाल 100टक्के लागला असून 85 पैकी 85 विद्यार्थी पास झाले आहेत. डिडोळा बु.येथील सरस्वती विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून 24 पैकी 24 विद्यार्थी पास झाले ओहत. छत्रपती शिवाजी सिंदखेड लपालीचा निकाल 100 टक्के लागला असून 34 पैकी 34 विद्यार्थी पास झाले, रोहीणखेड येथील नॅशनल उर्दू हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून 38 पैकी 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पिंपळगाव देवी येथील कुलस्वामीनी विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून 21 पैकी 21 विद्यार्थी पास झाले, तरोडा समता विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून 32 पैकी 32 विद्यार्थी पास झाले आहेत. श्री चांगदेव विद्यालय उबाळखेड येथील निकाल 100 टक्के लागला असून 46 पैकी 46 विद्यार्थी पास झाले आहेत. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तरोडाचा निकाल 100 टक्के लागला असून येथील 23 पैकी 23 विद्यार्थी पास झाले आहेत. राजूर येथील एचएस खान माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून 29 पैकी 29 विद्यार्थी पास झाले. सहकार विद्या मंदीर धा.बढेचा 100 टक्के निकाल लागला असून 45 पैकी विद्यार्थी पास झाले. मोताळा सहकार विद्या मंदीरचा निकाल सुध्दा 100 टक्के लागला असून 82 पैकी 82 विद्यार्थी पास झाले आहेत. डिडोळा बु.येथील एस.डी.पाटील माध्यमिक ॲण्ड उच्च माध्यमिक शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून तेथील फक्त 2 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती, त्यापैकी दोन्ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

श्रेणीनिहाय तालुक्याचा निकाल..
मोताळा तालुक्यात 1935 विद्यार्थी परिक्षेस बसले होते, त्यापैकी 1921 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परिक्षा दिली. त्यापैकी 1857 विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामध्ये 1042 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, प्रथम श्रेणीत 606 तर द्वितीय श्रेणीत 184 व 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!