चिखली (एकनाथ माळेकर – मैदानी खेळ हे शरीराला सुदृढ बनवितात. खेळांमुळे शरीर धष्टपुष्ट होते. खेळातून तरुणांमध्ये सांघिक भावना वृद्धिंगत होते. म्हणून पारंपरिक खेळ टिकले पाहिजेत. समाजाने आणि नेतृत्वाने अशा खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन हिरकणी महिला अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा सौ. वृषालीताई राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले. कोलारा येथील कबड्डी सामन्यांचे बक्षीस वितरण व महाप्रसाद वाटप त्यांच्याहस्ते पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान, बाजार समितीचे माजी संचालक बिंदूसिंह इंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. वाशिम वॉरिअर्स या संघाने पहिले बक्षीस जिंकून या सामन्यांवर आपले नाव कोरले.
चिखली तालुक्यातील कोलारा येथील सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त कोलारा येथे भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांत प्रथम बक्षीस – वाशिम वॉरियस यांना हिरकणी महिला अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा सौ. वृषालीताई राहुल बोंद्रे यांच्याहस्ते तर द्वितीय बक्षीस जय बजरंग संघ साखरखेर्डा यांना विद्याताई देशमाने यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. या शिवाय, तृतीय बक्षीस तपोवन तांडा या संघाला अभिजित राजपूत यांच्याहस्ते, चौथे बक्षीस राजूर गणपती या संघाला सौ.साकरकर ताई यांच्याहस्ते देण्यात आले. याप्रसंगी सौ.वृषालीताई बोन्द्रे यांच्या सत्कार कोलाराच्या माजी सरपंच सौ.अलकाताई गजानन सोळंकी यांनी केला. तसेच, विद्याताई देशमाने यांच्या सत्कार सौ. गीताताई संजय सोळंकी, अशोकभाऊ पडघान यांच्या सत्कार विदेही संत रामभाऊ संस्थानचे अध्यक्ष विष्णू महाराज सोळंकी यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान, बिदुसिंग इंगळे (माजी कृषी उत्पन्न बाजार संचालक चिखली), विष्णू माधवराव सोळंकी (माजी उपसरपंच कोलारा), संजय शंकरराव सोळंकी, समाधान दगडू सोळंकी, कैलास गवळी, संजय विष्णू सोळंकी, शिवदास साहेबराव सोळंकी, किसन विठोबा सोळंकी, बळीराम कौतिकराव सोळंकी, गजानन माऊली (माजी सरपंच कोलारा), किशोर मधुकर मंडळकर, ज्ञानेश्वर गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सचिन सोळंकी, संकेत मंडळकर, जीवन सोळंकी, संतोष सोळंकी आदींनी या सामन्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सोळंकी यांनी केले. संस्थांचे अध्यक्ष साहेबराव सोळंकी, धोंडोजी सोळंके, भगवान सोळंकी, लक्ष्मणभाऊ सोळंकी, शंकर बोरसे, वनिता सोळंके सरपंच कोल्हार इत्यादी प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थिती होती. महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा वृषालीताई बोंद्रे यांच्याहस्ते पार पडला.
—————