चिखली ऍक्सिस बँकेने केलेल्या फसवणुकीविरुध्द गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
चिखली (तालुका प्रतिनिधी) – दि २१ ऑक्टोबर रोजी भोरसी येथील शेतकरी बद्रीनारायन भुसारी यांनी ऍक्सिस बँक चिखली शाखेने केलेल्या फसवणूकीबद्दल गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीलदार, सहायक निबंधक व पोलीस स्टेशनकडे केली आहे.
दिलेल्या तक्रार अर्जात त्यांनी ऍक्सिस बँक शाखा चिखली यांच्याकडून खरीप पीककर्ज २०२२ घेतलेलं असून बँकेने माझा पीक विमा परस्पर मला न विचारता काढला होता व माझ्या खात्यातून ३८२९ रु वजा देखील केले आहेत माझी तीन शिवारात शेती असून, भोरसा गट न ७६ – २ .१८, भोरसी गट न ४५ – ०.३०, सावंगी गवळी गट न ८५ – ०.८३, यापैकी दोन गटातील पीक विमा बँकेने काढला. परंतु गट न ८५ मधील पीक विमा पैसे काटून देखील काढला नसल्याचे आता निदर्शनास येत आहे. ज्यावेळेस अकाउंट मधून पैसे कट झाले असता बँकेकडे विचारपूस करुन पावती मागितली असता आज देतो उद्या देतो अस करत वेळ काढू पणा करत परस्पर पैसे कट करून व विमा काढला असल्याचे भासवून मला विम्या पासून वंचीत ठेवण्यात आले, तरी माझ होणार नुकसान भरपाई देऊन माझ्या परस्पर अकाउंट मधून पैसे काढून देखील पीक विमा न काढल्याने बँकच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून यापुढे शेतकऱ्यांची कुणी फसवणूक करणार नाही तरी माझ्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अश्या आशयाची तक्रार कृषिमंत्री अब्दुल सत्तार, प्रशांत ढोरे पाटील राज्य प्रवक्ते रयत क्रांती पक्ष, अजित कुमार येळे तहसीलदार चिखली,अशोक लांडे ठाणेदार चिखली पोलीस स्टेशन,सहाय्यक निबंधक गारोळे साहेब यांच्याकडे भोरसा भोरसी येथील अन्यायग्रस्त शेतकरी बद्रीनारायन भुसारी यांनी ऍक्सिस बँकेच्या विरोधात तक्रार केली आहे.