खासदार प्रतापराव जाधव यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी
मेहकर(तालुका प्रतिनिधी):- मागील अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. कधी वादळी तर कधी अवकाळी पावसाने नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने काठावरचे सोयाबिन व इतर पिके तर कधीचीच नष्ट झाली.आज मेहकर तालुक्यातील फर्दापूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून खासदार प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त शेती आणि पिकांची पाहणी केली.
सोयाबिन काढणीची वेळ टळून गेली, पण पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना सोयाबिन सोंगता येत नाही. ज्यांनी सोयाबिन सोंगले ते सोयाबिन सडले. ज्या सोयाबिनची काढणी झाली नाही ते पीक पाण्यात उभे आहे. काढणी झालेल्या आणि उभ्या अशा दोन्ही प्रकारच्या सोयाबिनला कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यातच जिल्हा प्रशासन संथपणे पंचनामे करत असल्याचे दिसून येत आहे,त्या संदर्भात खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरूनच जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना फोनवर प्रश्न केला. मागील गेल्या चार दिवसांपासून मुसळधार आणि संततधार पावसाने कहर केला असून उरली-सुरली सर्व पिके हातातून गेली आहेत.व जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त पिंकाचे भान ठेवून सरसकट पंचनामे करावे.मागील गेल्या चार दिवसांपासून मुसळधार आणि संततधार पावसाने कहर केला असून उरली-सुरली सर्व पिके हातातून गेली आहेत.तरी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त शेत जमीनचे सरसगट पंचनामे करावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
यावेळी नायब तहसीलदार अजय पिंपरकर,मंडळ अधिकारी मेंटागळे ,चनखोरे ,महाजन कृषी सहाय्यक तलाठी, ग्रामसेवक,माजी संरपंच विठ्ठल मिस्कीन, शेतकरी बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.