जमिनीची मोजणी करून नकाशा देण्यासाठी लाच मागणारा लाचखोर भूमापक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी): वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीची मोजणी करीत हद्द कायम करून नकाशा देण्यासाठी 50 हजाराची लाच मागणारा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचा लाचखोर भूमापक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. सदर कारवाई उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 20 ऑक्टोबर रोजी केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 26 वर्ष तक्रारदार याने उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वर्ग (3)चे ल भूमापक अधिकारी प्रशांत अरुणकुमार खरात वय 36 यांच्याकडे वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीची मोजणी करून जमिनीची हद्द कायम करीत नकाशा देण्यासाठी मागणी केली त्यावेळी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कळंब चे भूमापक अधिकारी प्रशांत खरात यांनी तक्रारदारास 50 हजाराची मागणी केली. यावेळी तक्रारदार व भूमापक अधिकारी खरात तडजोडीअंती 40 हजार देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराने लाच न देता याबाबत तक्रारदाराने उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून एसीबी पथकाने प्रथम पडताळणी कारवाई केली असता भूमापक अधिकारी खरात यांनी तक्रारदारास 50 हजाराची लाच मागितली असून तडजोड करीत 40 हजार देण्याचे ठरले . यावरून उस्मानाबाद एसीपी पथकाने 20 ऑक्टोबर रोजी उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय येथे सापळा रचून भूमापक अधिकारी खरात यांना 40 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. सदर कारवाई डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद. विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली विकास राठोड, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे , सचिन शेवाळे, विशाल डोके,चालक दत्तात्रय करडे यांनी केली.