मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात अल्पावधीत लोकप्रिय व वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या, दैनंदिन सरासरी १५ लाख वाचकसंख्या असलेल्या ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या डिजिटल व इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये संतोष थोरहाते यांची ‘डिजिटल संपादक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या संपादकीय बोर्डाने काल ऑनलाईन झालेल्या बैठकीत या नियुक्तीस मंजुरी दिली. श्री थोरहाते हे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या युट्यूब चॅनलची स्वतंत्रपणे जबाबदारी सांभाळणार असून, त्याचे व्यावसायिक हक्कदेखील त्यांना कंपनीने प्रदान केले आहेत.
संतोष थोरहाते यांनी डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स व प्रिटींग क्षेत्रात आपल्या कार्याच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. शोधपत्रकारितेच्या त्यांनी अनेक विषयांना वाचा फोडलेली आहे. त्यांना गेल्या अनेक वर्षांचा सक्रीय पत्रकारितेचा अनुभव असून, हिवरा आश्रमसारख्या छोट्याशा खेड्यातून पत्रकारितेला सुरुवात करणार्या थोरहाते यांनी डिजिछोटयाशा खेडयातून करून अल्पावधीतच आपल्या विधायक पत्रकारीतेच्या माध्यमातून जिल्हयातील पत्रकारीतेच्या क्षेत्रात आपली ओळख डिजिटल माध्यमक्षेत्रात आज देशपातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या विधायक पत्रकारितेची दखल घेत त्यांना दर्पण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. समाजातील प्रतिभावंत, आरोग्य, कृषी, शिक्षण, साहित्यिक, कला क्षेत्रातील व्यक्ती, खेळाडू, उद्योगक्षेत्रात गगनभरारी घेतलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा जीवन प्रवास त्यांनी घेतलेल्या विविध मुलाखतीच्या माध्यमातून प्रकट झालेला आहे. संतोष थोरहाते यांच्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
तंत्रज्ञानाशी मैत्री असलेले व्यक्तिमत्व
संतोष थोरहाते यांची आधुनिक तंत्रज्ञानाशी चांगली मैत्री असून, यामध्ये ते अनुभवसंपन्न् व निष्णात आहेत. एडोब इनडिझाईन, फोटोशॉप, कॉरल ड्रॉ, एडोब इलस्ट्रेटर, प्रिमीअर अशा विविध सॉफ्टवेअरचा चपखल, कौशल्यपूर्ण वापर ते करतात. व्हिडिओ एडिटिंग व बातमीनिर्मिती यामध्ये त्यांचा चांगला हातगंडा आहे. हिवरा आश्रम अपडेट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण विषयांना राज्य व देशस्तरावर मांडले होते. या चॅनलचे ते मुख्य संपादक राहिलेले आहेत. एक उत्कृष्ट मुलाखतकार व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात.
——————-