‘बीईओ’ शिंदे यांचे मिशन ‘आयएसओ’ फत्ते; चिखली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३१ शाळा झाल्यात ‘आयएसओ’!
चिखली (प्रताप मोरे) – चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा सर्वागीण विकास व्हावा, तसेच शाळेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करुन विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने गट शिक्षणाधिकारी आर. डी. शिंदे यांनी मिशन आयएसओ शाळा व एनएमएमएस परीक्षेचे नियोजन आखले होते. या नियोजनामुळे तालुक्यातील तब्बल ३१ शाळांनी आयएसओचा दर्जा प्राप्त झाला असून, तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अशा नामांकन प्राप्त शाळांच्या शिक्षकांचा व शाळा समितीच्या सदस्यांचा गुणगौरव सोहळा आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते शिवाजी हायस्कूलमध्ये आज (दि.२०) रोजी पार पडला.
चिखली तालुक्यामध्ये गटशिक्षण अधिकारी पदावर कार्यरत असलेले आर. डी. शिंदे यांनी ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २५ शाळा आयएसओ करण्याच्या संकल्प हाती घेतला, आणि त्यादृष्टीने शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक यांच्या सभा घेऊन व शाळांना वारंवार भेटी देवून शिक्षकांना शाळा आयएसओ कशा करायच्या, याबाबत मार्गदर्शन केले, तसेच त्यांचे महत्व पटवून सागितले. या प्रेरणेतून मुख्याध्यापक तन मन धनाने कामाला लागले, आणि शिक्षण विभागात एक नवीन चैत्यन्याची लाट निर्माण होऊन गावांतील ग्रामस्थ व विद्यार्थी, शिक्षक, पालक या मिशनमध्ये सहभागी झाले. तालुक्यातील २५ शाळांनी नोंदणी केली, अथक प्रयत्नामुळे सुरवातीला पहिल्याच टप्प्यात २२ शाळा आयएसओ पूर्ण झाल्या. त्यामुळे एकापाठोपाठ तालुक्यातील ३१ शाळांनी आयएसओचा दर्जा प्राप्त केला. त्यामध्यें जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा अमडापूर, उर्दू उच्च प्राथमिक कन्या शाळा अमडापूर, उर्दू उच्च प्राथमिक मुले शाळा अमडापूर, मराठी उच्च प्राथमिक अंत्रीकोळी, मराठी प्राथमिक शाळा अंत्री वाघापूर, मराठी उच्च प्राथमिक शाळा अमोना, मराठी उच्च प्राथमिक शाळा असोला बुद्रुक, मराठी प्राथमिक शाळा भरोसावाडी (रामनगर ), मराठी प्राथमिक शाळा धोत्रा नाईक, मराठी उच्च प्राथमिक शाळा डोंगर शेवली, मराठी उच्च प्राथमिक शाळा इसरुळ, मराठी प्राथमिक शाळा जांभोरा, मराठी उच्च प्राथमिक शाळा करवंड, मराठी उच्च प्राथमिक शाळा कव्हळा, मराठी प्राथमिक शाळा कोलारा, उच्च प्राथमिक मराठी प्राथमिक शाळा करतवाडी, मराठी उच्च प्राथमिक शाळा मकरध्वज खंडाळा, मराठी प्राथमिक शाळा महिमळ, मराठी उच्च प्राथमिक शाळा माळशेंबा, मराठी प्राथमिक शाळा मोहदरी, मराठी प्राथमिक शाळा मुंगसरी, मराठी उच्च प्राथमिक शाळा मुरादपुर, मराठी प्राथमिक शाळा पाळसखेड जयंती, मराठी उच्च प्राथमिक शाळा सातगाव भुसारी, मराठी आदर्श शाळा शेळगाव आटोळ (आदर्श शाळा), मराठी प्राथमिक शाळा तांबूळवाडी, मराठी उच्च प्राथमिक शाळा टाकरखेड मुसलमान, मराठी उच्च प्राथमिक शाळा वळती, मराठी उच्च प्राथ शाळा वरखेड (आदर्श शाळा), मराठी प्राथ शाळा सावरगाव डुकरे (आदर्श शाळा), मराठी उच्च प्राथ शाळा धोत्रा भनगोजी (आदर्श शाळा) अशा एकूण ३१ शाळांच्या शिक्षकांचा व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा गुणगौरव आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सौ श्वेताताई महाले पाटील तर प्रमुख उपस्थिती गटशिक्षण अधिकारी आर. डी. शिंदे, शिवाजी शाळेचे प्राचार्य, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, रोहडा, गागलगाव, असोला, कवढळ, गुंजाळा, मेरा फाटा, मेरा खुर्द उर्दु, समूह साधन व्यक्ती, फिरते विशेष शिक्षक, यांनी कार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी आर. डी. शिंदे, सूत्रसंचालन उर्मिला शेळके, आभार केंद्र प्रमुख आर. आर. पाटील यांनी मानले.
चिखली तालुक्यातील मुरादपुर येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा मुरादपुर आज आयएसओ मानांकन प्राप्त झाले. आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिध्देश्वरभाऊ पाटिलबा गाडेकर व मुरादपूरचे उपसरपंच विष्णू महाराज गाडेकर व शाळा समिती सदस्य भारत जाधव व राहुल गाडेकर इतर सर्व सदस्य व गावातील नागरिकांनी विशेष सहभाग घेऊन शाळेसाठी योगदान दिले. शाळेचे मुख्याध्यापक गवई सर, सतीश बेलोकर सर, जाधव सर, व वाळेकर सर यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच गावातील सर्व नागरिकांनी सहभाग घेवून मुरादपूर येथील शाळा आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी योगदान दिले आहे.
————-