– चिखली तहसीलदार हलले नाहीत; पण आमदार बांधावर पोहोचल्या!
चिखली (एकनाथ माळेकर) – सोयाबीनसह शेतीपिकांची अतोनात नासाडी झाली असताना, व परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यात चोहीकडे हाहाकार उडाला असताना, चिखलीच्या तहसीलदारांनी तालुक्यात अतिवृष्टी झाली नसल्याने पंचनामे करण्याची गरज नाही, अशी शेतकरीविरोधी भूमिका घेतली होती. परंतु, ऐन सणासुदीत शेतकर्यांचे झालेले मोठे नुकसान पाहाता, आणि अतिवृष्टीने शेतकरी उद््ध्वस्त झाला असताना, चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी आज गांगलगाव, काेलारासह नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली व शेतकर्यांना दिलासा दिला. तहसीलदार जागचे हलले नाहीत, पण आमदार शेतकर्यांसाठी धावून गेल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, राज्य सरकारने सॅटेलाईटद्वारे पाहणी करून नुकसान भरपाई देण्याचे, व त्यादृष्टीने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची तरी अमलबजावणी तहसीलदार करतात की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
चिखली तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांची अतोनात नासाडी झाली आहे. पावसामुळे सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या असून, काही सुड्यांना पाण्यामुळे सोयाबीन कुजके झाले आहे. सोयाबीन, कपाशी, सह इतर पिके यांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा तहसीलदार व कृषी विभागाने तातडीने सर्व्हे किंवा पंचनामे करण्याची गरज असताना, अद्यापही तहसीलची यंत्रणा शेतकर्यांच्या बांधावर पोहोचली नाही. त्यामुळे अखेर आमदार श्वेताताई महाले पाटील यांनीच शेतकर्यांच्या बांधावर जात, शेतकर्यांना आधार दिला. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. लवकरच पंचनामे करण्यात येऊन शक्य तितक्या लवकर मदत देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, असे त्यांनी शेतकर्यांना सांगितले. आमदार महाले पाटील यांनी स्वतः येऊन चिखलीत असेल ते कर्मचारी सोबत घेऊन शेतकर्यांच्या शेतामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली, व शेतकर्यांना आश्वासन दिले की आम्ही सर्वतोपरी राज्य शासनाला आर्थिक मदत देण्यासाठी बाध्य करू. शेतकर्यांची अवस्था पाहून त्यांचे मन हेलावून गेले होते. झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाने तत्काळ सर्व्हे करावा, अशी मागणीही या वेळी शेतकरी बांधवांकडून करण्यात आली. राज्य सरकारकडून झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ मिळवून देण्याचा विश्वास यावेळी उपस्थित शेतकर्यांना आमदारांनी दिला.
याप्रसंगी नायब तहसीलदार डॉ. मुंढे साहेब, तालुका कृषी अधिकारी अमोलजी शिंदे, मंडळ अधिकारी जाधव साहेब, तलाठी काळे साहेब, तलाठी श्रीमती सुरसे मॅडम, कृषी सहाय्यक सोनुने साहेब, साहेबराव पाटील, सौ. नीताताई सोळंकी (तालुका अध्यक्ष भाजप महीला किसान आघाडी), गजेंद्र म्हस्के (तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा), श्री. बृहस्पती म्हस्के, गजेंद्र म्हस्के, राजेंद्र म्हस्के, गणेश म्हस्के, नितीन म्हस्के, उत्तमराव शेळके, गणेश शेळके, अनिल पाटील, साहेबराव सावळे, दत्तात्रय गायकवाड, अनिल म्हस्के, विष्णू म्हस्के, फकीर भाऊ म्हस्के, चेतन भानुसे, अक्षय सावळे, गजानन म्हस्के, गणेश म्हस्के, जमादार म्हस्के, समाधान म्हस्के, अमोल भानुसे, पुरुषोत्तम म्हस्के, सतीश सावळे, गजानन सावळे, रमेश म्हस्के, वसंतराव म्हस्के, पांडुरंग म्हस्के, शत्रुघ्न म्हस्के, सुनील शेळके, सुरेश म्हस्के, साहेबराव मामा शेळके, अनंत म्हस्के, विनायक सावळे, भारत सावळे, केटी म्हस्के, रमेश म्हस्के, उमेश म्हस्के, ज्ञानेश्वर म्हस्के, दिनकर चौधरी, विलास म्हस्के, मंडळ अधिकारी जाधव, तलाठी कटक, तालुका कृषी अधिकारी शिंदे, नायब तहसीलदार मुंडे, विमा प्रतिनिधी व इतर शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
चिखली तालुक्यात परतीचा पाऊस व अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ऐन दिवाळी सणाच्या काळात हे संकट शेतकर्यांवर कोसळले आहे. राज्य सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले असून, शेतकर्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार आहे. शेतकर्यांनी खचून जाऊ नये, संकटाचा धीराने सामना करावा. सरकार तुमच्या पाठीशी आहे.
– श्वेताताई महाले पाटील, आमदार चिखली
—————–