आमदार श्वेताताई महाले पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर: कोलारा येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी
चिखली ( ब्रेकिंग महाराष्ट्र) : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाली आहे . अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातून सोयाबीनच्या लागलेल्या सूड्या वाहून गेल्या तर अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके सडू लागली आहे. तसेच ज्या शेतामध्ये सूडयाच्या गंजीमधून पाणीवाहून गेल्यामुळे सोयाबीनच्या सुड्या मधील सोयाबिन पुर्णपणे खराब झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा आनंदाने करणे सुद्धा शेतकऱ्यांना कठीण झालेले आहे . याची सर्वतोपरी राज्य सरकार जिल्हाधिकारी, चिखली तहसीलदार व अन्य कृषी विभागाने तात्काळ तालुक्याचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना सरसकट मदतीचा हात देण्याची गरज आहे अशी विनंती शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. त्यामुळे चिखली मतदार संघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी कोलारा शिवारात पोहचून शेतकऱ्यांच्या बांधावर जात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार सौ. महाले शेतकऱ्यांना आर्थिक व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करू असे आश्वासन दिले .
यावेळी आमदार सौ. महाले यांच्या सोबत साहेबराव पाटील . डॉ .भवर , धोडू पाटील . उद्धव पवार , अनंत सोळंकी , परशुराम सोळंकी, सिद्धेश्वर भवर, शिवदास बोरसे , शिवदास सोळंकी, गणेश सोळंकी, विनोद सोळंकी, एकनाथ सोळंकी, परमेश्वर सोळंकी, प्रवीण पवार, मंडळ अधिकारी जाधव , तलाठी काळे , भाग एक तलाठी सुरसे मॅडम, भाग दोन कृषी सहाय्यक सोनूणे मॅडम व शेतकरी बहुसंख्य उपस्थित होते .