Breaking newsHead linesMaharashtraMumbai

युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करा, शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या!

– राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा – राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई (प्राची कुलकर्णी) – अगदी कालपर्यंत परतीच्या पावसाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून मदत द्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाला दिले आहेत. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे थेट सॅटेलाईट पद्धतीने करणार आहोत, सरकार शेतकर्‍यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. दीड महिन्यांमध्ये सात हजार कोटींची नुकसान भरपाई मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज (दि.२०) झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत देण्यास सांगितले असून, साडेचार हजार कोटी रूपये थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच कालपर्यंत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे केले जातील, तसेच आपल्याकडे पाठवल्यास लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकर्‍यांना बसला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या कामात विशेष लक्ष घालावे. पंचनामे करुन शेतकर्‍यांना तातडीने मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना सरकारतर्पेâ प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा’, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली. ‘ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा,’ असे राज ठाकरे यांनी या पत्रात नमूद केलेले आहे.


– मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय –
नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र स्थापन करणार. शासनाला दर्जेदार सल्ला व धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार.
– महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस घेणार. या माध्यमातून ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर.
– ऐच्छिकरित्या वाहनांचे स्क्रॅपिंग करणार्‍यांना व्याज व दंडमाफ करणार. भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटणार.
– ५ जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढवण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण.
– मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे २८०० बचत गट निर्माण करणार. १५०० महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण.
– भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी. एकूण ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी. भूविकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणार.
– ‘महाराष्ट्र एग्रीबिझनेस नेटवर्क’ (श्Aउर्‍Eऊ) संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देणार. शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य.
– राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील ३० जून २०२२ पर्यंतचे खटले आता मागे घेणार.

– माहिती तंत्रज्ञान तज्ञ विभागातील राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळणार.
– बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. १९१८ हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा.
– राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे भागभांडवल ३११ कोटी करणार.
– महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत २०० कोटींची तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय.
– १२५० मे टन प्रतिदिन गाळप क्षमता २५०० मे.टन पर्यंत वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल देणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!