Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsWorld update

काँग्रेसमधील घराणेशाहीचा अंत, दलित नेते मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – अखिल भारतीय काँग्रेसमधील गांधी घराण्याच्या घराणेशाहीचा अखेर अंत झाला आहे. दलित समाजातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तसेच अभ्यासू, जाणकार आणि पट्टीचे वक्ते असलेले मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी मताधिक्क्याने निवड झाली. ८० वर्षांचे खरगे हे कर्नाटकातील आहेत. त्यांनी पक्षांतर्गत निवडणुकीत शशी थरुर यांना मोठ्या फरकाने मात देत, अध्यक्षपदावर बाजी मारली. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेसमधील २४ वर्षांच्या घराणेशाहीचाही अंत झाला.

१७ ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकार्‍यांनी मतदान केले. नऊ हजार ३८५ सदस्यांपैकी ४१६ मते बाद झाली. उर्वरित मतांमध्ये मल्लिाकार्जुन खरगे यांना ७ हजार ८९७ एवढी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना एक हजार ७२ मते मिळाली. गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय असलेल्या खरगे यांनी शशी थरुर यांचा या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत पराभव केला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा आधीच राजीनामा दिला होता. भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत, त्यांना आता राजकीय संघर्षात दलित नेते असलेले मल्लिकार्जुन खरगे हे आव्हान देणार आहेत. काँग्रेसवर घराणेशाहीची टीका करणार्‍यांनाही या निकालाने चपराक बसली आहे.


मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती
– मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म १२ जुलै १९४२ चा.
– विद्यार्थी संघटनेचा नेता आणि मग राजकारणात प्रवेश
– काँग्रेस पक्षातील एक मोठा दलित चेहरा
– कर्नाटकातील मजुरांच्या हक्काची लढाई आणि आंदोलनांचे नेतृत्व
– १९७२ मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले
– २००८ पर्यंत सतत ९ वेळा आमदार म्हणून विधिमंडळात निवडून गेले
– २००९ आणि २०१४ असे दोन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले
– मनमोहनसिंग सरकारमध्ये श्रममंत्री
– उत्कृष्ट कबड्डी आणि फुटबॉल खेळाडू
– चांगले वक्ते, लोकसभा आणि राज्यसभेत दमदार भाषण करण्याची क्षमता


  • खरगे यांच्या काँग्रेस अध्यक्षपदी निवडीनंतर तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. यापूर्वी सीताराम येच्युरी हे गांधी घराण्याव्यतिरिक्तचे अध्यक्ष होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील हा नेतृत्वबदल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस आता नवी रणनीती आखेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेसचे अनुभवी नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात अध्यक्षपदासाठीची चुरस होती. त्यात अगदी अनपेक्षितपणे खरगे यांनी बाजी मारली आहे. शशी थरूर यांनी एक ट्विट करत मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद मिळणे ही गौरवाची आणि जबाबदारीची बाब आहे, असे त्यांनी लिहिले.
  • मल्लिकार्जुन खर्गेंचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वारावत्ती भागात एका शेतकरी कुटुंबात झाला. गुलबर्गा इथल्या नूतन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर इथल्याचं सरकारी महाविद्यालयातून त्यांनी पदवीची डिग्री मिळवली. या महाविद्यालयात ते विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस होते. गुलबर्गामधील शेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीची डिग्री घेतली.
    —————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!