चिखली (विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील गांगलगाव येथे जानाई माता यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या यात्रेच्या निमित्ताने ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन हजारांवर नागरिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. ही यात्राही उत्साहात संपन्न होत आहे.
दरवर्षी गांगलगाव येथे पारंपरिक पद्धतीने जानाई माता यात्रेचे आयोजन करण्यात येते. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यात्रेत अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. यावर्षी आरती क्रिएशन प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ऋषिकेश म्हस्के पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन वायाळ, सरपंच गणेश म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य नितीन म्हस्के, विनायक सावळे, मनसे तालुकाउपध्यक्ष कृष्णा अंभोरे, सुनील भास्कर म्हस्के, गजानन प्रल्हाद म्हस्के, विठ्ठल खेडेकर, ग्रा.पं. सदस्य संदीप सावळे, समाधान म्हस्के यांचे सहकार्य लाभले. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर, उपनिरीक्षक वासाडे, पवार, जाधव तसेच गावचे पोलीस पाटील अनिल सावळे यांची उपस्थिती होती. समस्त गावकर्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
————-