– उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले. चाळीस डोक्याच्या रावणाने धनुष्यबाण गोठवलं. उलट्या काळजाची माणसे आणि कंपू फिरतोय. त्यांनी कट्यार आईच्या काळजात घुसवली. याचा आनंद त्यांच्या ‘महाशक्ती’ला झाला असेल, अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यातून त्यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रणशिंग फुकले. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल ही तीन चिन्ह दिली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. यासोबतच त्यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आज माझ्या कुटुंबीयांशी संवाद साधतोय. मुख्यमंत्रीपद ज्यांना हवे होते त्यांनी ते घेतले. सर्व देऊनही नाराज असल्याचे सांगत काही जण निघून गेलेत. मेळावा होऊ नये म्हणून खोकासुरांनी प्रयत्न केलेत. ४० डोक्यांच्या रावणाने रामाचे धनुष्यबाण गोठवलं. पण, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत आहे. काही जणांनी आपल्याशी गद्दारी केली, असा घणाघात ठाकरे यांनी शिंदे गटावर केला. दोन मेळावे झाले, पण एका ठिकाणी सर्व काही पंचतारांकित होतं. शिवसेना नाव माझ्या आजोबांनी दिलंय. शिवसेनेला पहिले यश ठाण्यात मिळाले. पण, उलट्या काळजाच्या माणसाने निवडणूक चिन्ह गोठवलं. शिवसेना प्रमुखांनी दिलेली हिंमत तुम्ही गोठवली. संकट येतात जातात, संकट एक संधी देऊन जातात. मिंधे गटाचा उपयोग भाजप कसा करून घेतोय त्यांना माहीत नाही. निष्ठा विकली जाऊ शकत नाही हे जनतेने शिवतीर्थावर पाहिले आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. शिवसैनिकांना आता दमदाट्या सुरू आहेत. शिवसेना संपविण्याचे काम काँग्रेसनही केले नाही ते तुम्ही करता, अशी टीका शिंदे गटावर केली. बाळासाहेबांचे नाव न वापरता जनतेसमोर या, असें आव्हान उद्धव ठाकरे याचे शिंदे गटाला दिले. ते अपात्र ठरले तर चिन्ह गोठवण्याची जबाबदारी कोण घेईल?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोगाला दिलेली नाव व चिन्हे द्यावे. यासाठी ठाकरेंनी पक्षासाठी तीन नावे दिलीत.ती म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी आहेत. याशिवाय, त्रिशूळ, उगवता सूर्य व धगधगती मशाल ही चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केलीत. आम्हाला तीन नावातले एक नाव व चिन्हे द्या. आम्हाला जनतेच्या दरबारात जायचे आहे. अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाला केली आहे.
—————–
https://fb.watch/g2uHpq9uGs/