Breaking newsCrimeVidharbha

उधारीवरून वाद : दारुड्याने दारू विकणाऱ्याच्या डोक्यात विट घालून केला खून 

बुलडाणा( जिल्हा प्रतिनिधी ): दारू आणि दूध विकण्याच्या धंदा करणाऱ्या वृद्धासोबत उधारीच्या पैशावरून वाद झाल्याने दारुड्याने ६० वर्षीय वृद्धाच्या डोक्यात विट घालून खून केला. १६ जूनच्या सकाळी मलकापूर शहरातील गाडेगाव हनुमान मंदिर पवनसुत नगरात ही खळबळजनक घटना उघडकीस आली. मलकापूर शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला गजाआड केले असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

मलकापूर येथील अशोक उत्तम सोनोने वय 60 यांच्याकडे बकऱ्या असून बकऱ्याचे दूध विकण्याचे अवैधरित्या दारू विक्री करण्याचा व्यवसाय ते करत होते. विष्णू शालिग्राम चंदन वय 40 हा अशोक सोनोने यांच्याकडून दूध व दारू उधारीत घेत होता. त्यामुळे विष्णू चंदन याच्याकडे जवळपास ४ हजार रुपयांची उधारी झाली होती. मात्र तरीही विष्णू हा पैसे द्यायला तयार नव्हता. 15 जून रोजी विष्णू चंदन पुन्हा अशोक सोनोने यांच्याकडे दारू घेण्यासाठी गेला असता आधीच्या उधारीवरून दोघांत वाद झाला. या वादातच त्याने सोनोने यांच्या डोक्यात विटेचा जोरदार प्रहार केला. त्यामुळे अशोक सोनोने रक्ताच्या थारोळ्यात पडले. 16 सकाळी 8 वाजले तरी अशोक सोनोने झोपेतून उठले नसल्याने स्थानिकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू झाली. त्यांच्या घरातील लाईट सुद्धा सुरू होता. यावेळी नागरिकांनी घरात जाऊन पाहिले असता अशोक सोनोने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसले. नागरिकांनी घटनेची पोलिसांना माहिती देताच ठाणेदार विजयसिंह राजपूत, डी. बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हासाए, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप, रतंनसिंग बोराडे, पोकॉ ईश्वर वाघ,प्रमोद राठोड, सलीम बरडे, संतोष कुमावत, शेख आसिफ, मंगेश चरखे, निलेश तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आधी तिघा संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी दोघांनी विष्णू चंदन हाच सोनोने यांच्याकडे जात होता असे सांगितले. त्यामुळे विष्णू चंदन याच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली मात्र त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच विष्णू चंदन याने अशोक सोनीने यांचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी मृतक अशोक सोनोने यांची सून सौ. चंदा निलेश सोनोने हिच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी विष्णू चंदन विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!