नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) : दुकानात सामान आणण्यासाठी जात असतांना देवांनद नदी ओलांडतांना तीन चिमुकल्याचा नदी नदीन पात्रात बुडून करुन अंत झाला. ही ह्रदयदावक घटना १५ जून रोजी कुंडलचा मालपाडा परीसरात उघडकीस आली.
नंदुरबार जिल्हातील धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालापाडा येथे पाडवी कुटुंब वास्तव्यास राहत असून निलेश दिलवर पाडवी वय ४ , मेहेर दिलवर पाडवी वय ५ व पार्वती अशोक पाडवी वय ४ या तिघांना १५ जून रोजी आईने दुकानातून सामान आणण्यास सांगितले. त्यामुळे तिघे चिमुकले हे दुसऱ्या पाड्यावरील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेले. मात्र दुसऱ्या पाड्यावर जाण्यासाठी चिमुकल्यांना देवानंद नदी ओलांडून जावी लागत होती. यावेळी या चिमुकल्यांना या नदीतपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुले सामान आणण्यासाठी गेली मात्र अद्यापही परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता तिघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.