– मनेगाव फाटा-निपाणी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर!
औरंगाबाद/कन्नड (संदीप गायके) – मनेगाव फाटा ते निपाणी रस्ता पूर्ण व्हावा, यासह विविध मागण्यांसाठी हिंदवी जनक्रांती संघटनेसह शेतकरी व ग्रामस्थांनी साहानगाव धरण (ता.कन्नड) येथे जलसमाधी आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांनी धरणात उड्या घेतल्या. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी आंदोलकांना वाचवले होते. म्हणून अनर्थ टळला होता. या आंदोलनाची दखल घेत, जिल्हा प्रशासनाने तातडीने रस्त्यावर खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असून, डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व कायदेशीर मान्यता पूर्ण करून रस्ता काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
सविस्तर असे, की शेतकरी व जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, विविध प्रश्नासाठी व मनेगाव फाटा ते निपाणी रस्ता पूर्ण व्हावा यासाठी साहानगाव धरण (ता.कन्नड) येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी आंदोलकांनी धरणात उड्या घेतल्या, पण अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना वाचविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी आंदोलनाचे नेते उदय पाटील गवळी यांनी तातडीने, तहसीलदार व आमदार राजपुत यांना फोन करून सांगितले की, जर आंदोलकांच्या जिवाला काही झाले तर जबाबदार तुम्ही असाल. तेव्हा प्रशासनाचे नायब तहसीलदार सोनवणे मॅडम, जिल्हा परिषदेचे अभियंता बलखंडे हे आले व त्यांनी लेखी आश्वासन दिले आणि तात्काळ जेसीबी मशीनने रस्त्यावरील खड्डे बुजवयास चालू केले व जिल्हा मार्ग प्रजीमा २४ मध्ये लांबी वाढून तसा प्रस्ताव यापूर्वीच पाठवला आहे, तसेच डिसेंबर महिन्यात सर्व कायदेशीर मान्यता पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले व जर लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आली नाहीतर पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनाचे आयोजन उदय पाटील गवळी यांनी केले होते. प्रमुख उपस्थिती हिंदवी जनक्रांती सेनेचे अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांची होती. तसेच या प्रसंगी रामचंद्र परसराम रिंढे, विलास जगन्नाथ गायके, समाधान भाऊसाहेब आहेर, आप्पासाहेब एकनाथ बोडखे, शेषराव श्रीरंग धाटबळे, ईश्वर चंद्रभान रिंढे, बळीराम रावसाहेब गायके, शीलाताई नांगरे, उपसरपंच प्रताप पाटील, जगदीश पाटील गायके, सोमनाथ काका गायके व हिंदवी जनक्रांती सेनेचे संतोष पाटील गोरे, सोमनाथ दादा मोरे, दीपक पाटील साहानखोरे, अर्चना अजय पाटील साळुंके, पत्रकार नितीन साळुंके, संदीप गायके व साहानगावकर, खामगावकर, मनेगा्वकर, मनोलीकर, निपाणीकर, रोहीलेकर, बोलठाणकर आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकजुटीला मोठें यश प्राप्त झाले तसेच पोलिस निरीक्षक मोरे, मोठ्या प्रमाणात पोलिस, अग्निशामक दलाचे पथक मंडल अधिकारी इत्यादी उपस्थित होते. माजी आमदार यांनी फक्त सत्ता भोगल्या व आजी आमदारांनी हे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.