भोटा ते कालवड रस्ता दुरुस्तीसाठी मलकापूर उपविभागीय कार्यालयासमोर मनविसेचे उपोषण सुरू
मलकापूर :(ब्रेकिंग महाराष्ट्र)-: महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ, मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे,मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कार यांच्या नेतृत्वात ६ जून २०२२ रोजी भोटा ते कालवड पर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन दिले होते. परंतु संबंधित विभागाने आजपर्यंत त्याची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नसल्याने पुन्हा १५ सप्टेंबर २०२२ रोजी मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर व मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांच्या नेतृत्वात स्मरण पत्र दिले असून २७ सप्टेंबरपर्यंत संबंधित निवेदनाची दखल न घेतल्यास २८ सप्टेंबर पासून उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता त्यानुसार २८सप्टेंबर रोजी उपविभागीय बांधकाम उपविभाग मलकापूर यांच्या कार्यालयासमोर मनविसेचे उपोषण सुरू केले आहे
भोटा ते कालवड पर्यंत रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत असून ठिक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी माटरगांव बृ, जलंब, खामगाव ला दररोज प्रवास करावा लागतो परंतु रस्त्याअभावी खामगाव आगाराची बस बंद झाली असून भोटा पासून कालवड पर्यंतचा प्रवास विद्यार्थी रस्त्यावर ठिक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यातून आपला प्रवास करतात यामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश खराब तर होतातच शिवाय ३ किलोमीटर प्रवास पायीच करत असल्याने विद्यार्थी बर्याचदा उशिरा पोहचतात व त्यांची बस निघून जाते. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याला जबाबदार संबंधित बांधकाम विभागातील अधिकारी आहेत,तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी मलकापूर मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील, गणेश ठाकूर, मनवीसे तालुका अध्यक्ष गणेश जैस्वाल, शहर अध्यक्ष निखिल पोंदे,दिपक जाधव, गजराज सोळंके, कृष्णा चंदनशिव, प्रेम तायडे, उदय वानखेडे, विनायक पारस्कर, गणेश मानकर, भागवत पारस्कर, वैभव पारस्कर यांचे सह मनविसे तथा मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.