औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – देवगाव रंगारीनजीकच्या औराळा फाटा येथे झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणार्यांवर पोलिसांनी छापा मारून पाच जुगार्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, मोबाईल असा ४४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर असे, की मौजे औराळा फाटा येथे पोलिस उपनिरीक्षक खांडखुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ओमंकार पाणी फिल्टरच्या भिंतीलगत मोकळ्या जागेवर काही इसम हे झन्नामुन्ना नावाचा जुगार खेळत आहेत. त्यावरुन त्यांनी वरील ठिकाणी पोलिस पथकासह छापा मारला असता, सदर ठिकाण इसम नामे १) चांगदेव नरहरी शिंदे वय-४२ वर्षे रा.विटा ता.कन्नड २) एकनाथ सुदाम गोरे वय २५ वर्षे रा.चापानेर ता.कन्नड ३) सुनिल बाबुराव निकम वय-३० वर्षे रा.गव्हाली ता.कन्नड ४) लहु बळीराम राठोड वय-३१ वर्षे गव्हाली ता.कन्नड ५) प्रमोद दगडु जाधव वय- २८ वर्षे रा.हसनखेडा ता.कन्नड हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्यासह एकूण ४४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्यावर पोलीस ठाणे देवगाव रंगारी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर कारवाई पोलिस उपनिरीक्षक खांडखुळे यांच्यासोबत पोलीस नाईक दिनेश कोळी, अनिल खरात, पोलीस अमंलदार, भावसिंग जारवाल, किरण जाधव, किसन गवळी यांनी यांनी केली आहे.