मोताळा तालुक्यात आर्थिक देवाणी घेवाणीमुळे चालतो अवैध धंद्याचा फड, तालुका काँग्रेस म्हणते आंदोलन छेडणार!
बुलडाणा- देशात कायद्याचे राज्य चालू आहे, परंतु ‘काय’द्या घ्या मुळे आजरोजी सर्वीकडे राजरोसपणे अवैध धंद्याना मोठ्या प्रमाणात उत आला आहे. या अवैद्य धंद्याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने बोराखेडी व धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेल्या गावांमध्ये अवैध धंद्यांचा फड मोठा प्रमाणात रंगला आहे, या अवैद्य धंद्यांना वरदहस्त कोणाचा आहे, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करुन पैश्याचा देवाण-घेवाणीवरुन एएसआय व ठाणेदारांचा वाद व्हॉटसॲप ग्रुपवर पोहचल्याने पोलिस प्रशासनाची प्रतिमा जनमाणसात मलीन झाली आहे. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन मामलकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोताळा तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधिक्षक, गृहमंत्री, अमरावती पोलिस आयुक्त यांना 15 जून रोजी निवेदन देवून अवैधधंदे बंद 7 दिवसात बंद न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मोताळा तालुक्यात बोराखेडी व धा.बढे पोलिसांच्या दुर्लक्षीत कारभारामुळे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. तर दुसरीकडे मोताळा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून या चोरट्यांचा शोध लावण्यास पोलिस प्रशासन अपयशी ठरले असून एका चोरीचा शोध लागतो तोच चोरटे दुसरी चोरी करुन मोकळे होतात. बोराखेडी व धा.बढे पोस्टे.अंतर्गत वरली मटका, जुगार, अवैध देशी व विदेशी दारु मोठ्या प्रमाणात ग्रामीणभागासह शहरातील अवैध विक्री होत आहे. आर्थिक देवाणीघेवाणीमुळे दोन्ही पोस्टे.चे तेरी भी चूप मेरी चूपचा प्रकार सुरु असल्याने यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिक नाहक भरडल्या जात आहे. तीन दिवसापुर्वी जुगार रेडमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीमुळे वाद झाल्याने बोराखेडी ठाणेदार राजेंद्र पाटील व एएसआय राजेश आगाशे यांचा वाद व्हॉटसॲप ग्रुपवर कारवाईची कॉपी व व्हीडीओ टाकून आगाशे यांनी मी पैसे घेत नाही याची पोस्ट व्हायरल केली, मोताळ्यात लोखंडे कॉम्प्लेक्स जवळील जुगार धाडीमध्ये तुम्ही 60 हजार घेतले, तुमची चौकशी करण्याचे आदेशीत केल्याचा आरोप एएसआय आगाशे यांनी ठाणेदार पाटीलवर करुन खळबळ उडवून दिली होती. चोरीची फिर्याद देण्यास गेलेल्या फिर्यादीची लवकर फिर्याद घेतली जात नसून त्यांना तासनंतास बसवून ठेवण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोपी काही व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे. आर्थिक देवाण घेवाणीमुळे अवैधधंदे चालत असल्याने पोलिसांचा जनमाणसात वचक राहिला नाही. बोराखेडी व धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेले अवैध धंदे बंद न झाल्यास काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन मामलकर, गणेशराव पाटील, ॲड.विजयसिंग राजपूत, मिलींद जैस्वाल, महेंद्र गवई, सलिम चुनेवाले, उखा चव्हाण, तुळशीराम नाईक, साहेबराव डोंगरे, विलास पाटील, उत्तमराव वैराळकर, विजय सुरळकर, प्रकाश बस्सी, कैलास गवई, रवि पाटील, अविराज पाटील, अभिजीत खाकरे, शिवाजी हरमकार, श्रीकृष्ण खराटेसह शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
बोराखेडी व धा.बढे परिसरात सुरु असलेले अवैध धंदे बंद पोलिस प्रशासन बंद करील का? धंदे बंद न झाल्यास मोताळा तालुका काँग्रेस कमिटी खरंच येणाऱ्या 8 दिवसानंतर आक्रमक आंदोलन छेडून देशी दारु तसेच अवैधधंदे बंद करण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबाब निर्माण करेल, की पोलिसांच्या आर्थिक देवाण घेवाणीमुळे पुन्हा गाव तेथे देशी दारु व अवैध धंदे सुरु राहतील, याचे चित्रही येणाऱ्या दिवसामध्ये स्पष्ट होईल, एवढे मात्र निश्चीत!
काँग्रेसचे मोताळ्यात जेलभरो आंदोलन!
केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार घाबरलेले असून सुडबुध्दीने काँग्रेस अध्यक्षा खा.श्रीमती सोनियाजी गांधी व खा.राहुलजी गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयामार्फत ईडीचा हल्ला करीत आहे. केंद्र सरकारच्या या कारवाईच्या विरोधात मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने 15 जून रोजी मोताळा फाट्यावर भाजपा सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. बोराखेडी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेवून नंतर त्यांना सोडून देण्यात आले.