Breaking newsHead lines

“अग्निपथ”विरोधी आंदोलन पेटले!

– केंद्राच्या अग्निपथ लष्करी भरती योजनेला तरुणांचा तीव्र विरोध
– बिहारमध्ये रेल्वेसेवा ठप्प, रोहतकमध्ये विद्यार्थी शहीद
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या लष्करी भरतीच्या अग्निपथविरोधी योजनेविरोधात देशभरातील तरुणाई संतप्त झाली असून, सात राज्यांत तरुणवर्ग रस्त्यावर उतरला आहे. कंत्राटी पद्धतीने लष्करी भरती करण्यास तरुणवर्ग आक्रमक होत विरोध करत आहेत. बिहारमधून सुरु झालेले हे हिंसक आंदोलन आज उत्तरप्रदेश, हरियाना, हिमाल प्रदेशसह सात राज्यांत पोहोचले. आक्रमक तरुणांना रोखण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी गोळीबार करत, काही ठिकाणी अश्रुधुराचे नळकांडी डागत, लाठीमार केला. या कंत्राटी लष्करी भरतीविरोधात रोहतक येथील विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पलवलमध्ये विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य करत आग लावली.
केंद्रीय राखीव पोलिस व स्थानिक पोलिसांनी हरियानामधील परिस्थिती नियंत्रणात आणली असून, धर्मशाळा येथे निवडणूक प्रचारासाठी जात असलेल्या पंतप्रधान मोदींची सुरक्षा पाहाता, तरुणांना महामार्गावरच रोखण्यात आले होते. हिंसक आंदोलन पाहाता बिहारमध्ये रेल्वेसेवा ठप्प पडली होती. जोधपूरसह राजस्थानातदेखील ठीकठिकाणी आंदोलने झालीत.

काय आहे अग्निपथ योजना
केंद्र सरकारने अग्निपथ योजना ही लष्करी भरतीसाठी लागू केली आहे. कमी कालावधीसाठी असलेली ही भरती कंत्राटीसदृश भरती आहे. या योजनेंतर्गत भारतीय लष्करात भरती होणार्‍या जवानाला अग्निवीर असे म्हटले जाणार असून, एकूण चार वर्षे तो सेवा देईल. त्यापोटी त्याला ३० ते ४० हजार रुपये दरमहा पगार मिळेल व शेवटी ११.७१ लाख रुपये मिळतील. या अग्निवीरांना देशात कुठेही नियुक्ती मिळू शकते. अशा प्रकारच्या कंत्राटी लष्करी भरतीविरोधात देशातील तरुण पेटून उठलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!